Accident : मिसिंग लिंकवर तीन तासांत दोन अपघात, मुंबई - पुणे वाहतूक विस्कळीत

पुणे : मुंबई ते पुणे प्रवास हा प्रवास वेगाने करण्यासाठी मिसिंग लिंक सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे प्रवास वेगवान झाला आहे. पण शुक्रवार १५ मे रोजी मिसिंग लिंक परिसरात तीन तासांत दोन अपघात झाले. या अपघातांमुळे एक्सप्रेस वे वरील मुंबई - पुणे दरम्यानच्या वाहतुकीचा वेग मंदावला.



पहिल्या अपघातात टँकर उलटला तर दुसऱ्या अपघातात त्याच ठिकाणी एका भरधाव खासगी बसने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या लागोपाठ झालेल्या दोन अपघातांमुळे एक्सप्रेस वे वरील मुंबई - पुणे दरम्यानची वाहतूक मंदावली. प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.



संध्याकाळी मिसिंग लिंक परिसरात दोन ट्रक एक कंटेनर यांचा अपघात झाला. अवजड वाहने उलटली. ही घटना ताजी असतानाच त्याच भागात काही वेळानंतर एका खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने भरधाव बसद्वारे चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण काही प्रवासी जखमी झाले.



जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर महामार्ग पोलीस आणि बचाव पथकाने अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पण तीन तासांत दोन अपघात झाल्यामुळे एक्सप्रेस वे वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. अपघात प्रकरणी सर्व वाहनांची तसेच ज्या भागात अपघात झाला तिथल्या रस्त्याची तपासणी केली जाणार आहे. आधी गेलेल्या एखाद्या वाहनातून काही गळती झाल्यामुळे अपघात झाला का याचाही तपास सुरू आहे. अपघाताचे कारण तांत्रिक होते की चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत होता हे तपासातून पुढे येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि