लखनऊ: उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका घरात मोबाईल चार्ज करताना शॉर्ट सर्किट झाल्याने मोठा अपघात घडला. शॉट सर्किट झाल्यानंतर मोबाईलचा स्फोट झाला. यामुळे घरात आग लागली आणि ६ जणांचे कुटुंब गंभीररित्या होरपळले. यात दुर्घटनेत ४ मुलांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची स्थिती गंभीर आहे. ही घटना पल्लवपुरम ठाणे क्षेत्रातील जनता कॉलनीमध्ये घडली. शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली.
मोबाईलच्या स्फोटाने चार मुलांचा मृत्यू
मूळचा मुझ्झफरनगर येथे राहणारे जॉनीचे कुटुंब जनता कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. तो वेठबिगारीच्या कामाला होता. होळीमुळे शनिवारी तो घरीच होता. त्याची पत्नी बबिता जेवण बनवत होती. त्यांची मुलगी सारिका(१०), निहारिका(८), मुलगा गोलू(६) आणि मुलगा कालू(५) खोलीत होते.
या खोलीच्या बोर्डावर मोबाईल चार्जिंगला लावला होता. विजेच्या बोर्डामध्ये लावलेल्या चार्जरमध्ये अचानक शॉट सर्किट झाले आणि ठिणगी उडून तेथील बेडवर पडली आणि आग लागली. आगीने लगेचच विक्राळ रूप धारण केले. आगीने वेढल्याने बबिता, सारिका आणि जॉनी यांनी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ते या आगीत गंभीररित्या होरपळले.
जोरजोरात आवाज ऐकून शेजारी आले. सर्वांना एक एक करून बाहेर काढले. सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथून त्यांना मेरठच्या लाल लजपतराय मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले.
आई-वडिलांची प्रकृती गंभीर
उपचारादरम्यान मेडिकल कॉलेजमध्ये निहारिक आणि कालू यांनी प्राण सोडले. बाकी सर्वांवर उपचार सुरू होते.मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाला. पत्नी-पतीची स्थिती नाजूक झाली आहे.