चंदिगढ : पंजाब (Panjab) मधील संगरूर (Sangrur) जिल्ह्यात विषारी दारू (Spurious Liquor) प्यायल्याने आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
संगरूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, इथेनॉलयुक्त मद्य प्राशन केल्यानंतर किमान ४० लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यापैकी, बुधवार, २० मार्च रोजी, विषारी मद्य प्राशन केल्याने चार लोकांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी, २१ मार्च रोजी, पटियालाच्या राजिंद्र रुग्णालयात उपचारादरम्यान आणखी चार जणांचा मृत्यू झाला.
तर, शुक्रवार २२ मार्च रोजी ८ लोकांचा मृत्यू झाला. तसेच शनिवारी ५ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण मृतांची संख्या २१ झाली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी आणखी दोघांना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीत अटक केलेल्या आरोपींनी एका घरात विषारी दारू तयार होत असल्याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घरावर छापा टाकून २०० लिटर इथेनॉल हे विषारी रसायन जप्त केले.
पोलीस उपमहानिरीक्षक हरचरणसिंग भुल्लर यांनी सांगितले की, या घटनेत आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला असून आम्ही या प्रकरणात दोन नवीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा आणखी तपास सुरू असून दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल.
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…