Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे हा सत्तेसाठी पिसाळलेला नेता!

चंद्रशेखर बावनकुळे यांची जहरी टीका


मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका करत आहेत. पंतप्रधानांची तुलना ते औरंगजेबाशी करत आहेत. यामुळे भाजपचे नेते त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. थेट देशाच्या पंतप्रधानांवर खालच्या पातळीची टीका केल्याने भाजप नेत्यांनी ठाकरे व राऊतांविरोधात टीकास्त्र उपसले आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंना चांगलेच धारेवर धरले. 'उद्धव ठाकरे हा सत्तेसाठी पिसाळलेला नेता आहे', अशी जहरी टीका बावनकुळे यांनी केली.


चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा औरंगजेब म्हणून उल्लेख करतात. महाराष्ट्र आणि देशातील जनता ही गोष्ट खपवून घेणार नाही. किंबहुना औरंगजेबी वृत्ती असलेल्या उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या भावाला सर्वप्रथम घराबाहेर काढले. त्यांनीच राज ठाकरे यांना दूर केले. सख्ख्या भावासारख्या देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचीच वृत्ती औरंगजेबासारखी आहे. सत्तेसाठी पिसाळलेले उद्धव ठाकरे आता मोदींना औरंगजेब म्हणत आहेत. उद्धव ठाकरे २२ जानेवारीची तारीख विसरले का? पण ४ जून येऊ द्या, मग तुम्हाला दिसेल. २०२४ ची लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट निवडणूक असेल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त आणि निराश मनस्थितीत आहेत. त्यांना बुद्धीभ्रंश झाला आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे हा सत्तेसाठी पिसाळलेला नेता आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

Comments
Add Comment

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८

‘अण्णांनी’ केलं ‘दादांना’ गारद

मोहोळांच्या रणनितीपुढे अजित पवार फिके; राष्ट्रवादीची पडझड पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी

मालेगाव महापालिकेत ‘इस्लाम’ची मुसंडी

मुंबई : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून निवडणूक झालेल्या ८३

वसंतदादा पाटील यांची चौथी पिढी राजकारणात

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील वारसदार हर्षवर्धन पाटील यांनी

लातूरमध्ये कॉग्रेसचा ‘ हात’ भारी

अमित देशमुख यांनी चक्रव्यूह भेदले लातूर : दलित, मुस्लिम आणि लिंगायत मतांचा आधार घेत आखलेल्या रणनीतीला भाजपच्या