Monday, December 2, 2024
Homeब्रेकिंग न्यूजBMC Commissioner : मुंबई मनपाच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची निवड

BMC Commissioner : मुंबई मनपाच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची निवड

निवडणूक आयोगाने इक्बाल सिंह चहल यांच्या बदलीचे दिले होते आदेश; काय आहे कारण?

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठं पाऊल उचललं होतं. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला ज्या अधिकाऱ्यांनी एखाद्या नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षांपेक्षा अधिक वर्ष काम केलं असेल, त्यांची बदली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. निवडणूक आयोगाने बृहन्मुंबई महापालिका आयुक्त (Brihanmumbai Municipal Commissioner) इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्या बदलीचे आदेश दिले होते. त्यानंतर आता मुंबई मनपाच्या आयुक्तपदी भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांची निवड करण्यात आली आहे. तर ठाणे मनपाच्या आयुक्तपदाचा भार सौरभ राव (Saurabh Rao) यांच्यावर सोपवण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाचा बदलीबाबत स्पष्ट आदेश असूनही महाराष्ट्र सरकारने अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या नव्हत्या. महाराष्ट्रासह देशभरात जवळपास अशीच स्थिती होती. दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने बदल्यांच्या मुद्द्यावर विविध राज्य सरकारांना दणका दिला होता.

पश्चिम बंगालचे डीजीपी राजीव कुमार यांनाही हटवून त्यांना आयटी डिपार्टमेंटचा सेक्रेटरी बनवण्याचा निर्णय आयोगाने घेतला. यांच्याशिवाय, आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या गृह सचिवांसह बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना हटवण्याचे आदेश दिले होते.

याशिवाय हटवण्यात आलेल्यांच्या यादीत मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांचाही समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी निवडणूक आयोगाचा हा आदेश आला होता. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -