Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या डोक्याला टाके, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. दरम्यान, डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे त्या देखरेखीखाली राहणार आहे. राज्य सरकारच्या संचलित एसएसकेएम रुग्णालयाचे डायरेक्टर डॉ. मणिमोय बंदोपाध्याय यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री बॅनर्जी यांना घरी पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात आणण्यात आले. येथे त्यांना काही टाके पडले.


रुग्णालयाचे डायरेक्टर डॉ. मणिमोय बंदोपाध्याय यांनी गुरूवारी रात्री मीडियाशी बातचीत करताना सांगितले की दुखापतीवर उपचार झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांना पाठीमागून धक्का बसला होता. यामुळे त्या आपल्या घरात पडल्या. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.


रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या डोक्यावर तीन टाके पडले आहेत. तसेच एक टाका त्यांच्या नाकावर घालण्यात आला. येथून रक्त वाहत होते.


डॉ. मणिमोय बंदोपाध्याय म्हणाले, मुख्यमंत्र्यांबाबत संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की पाठीमागून धक्का लागल्याने पडल्या आहेत. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. यामुळे खूप रक्तही वाहत होते. रुग्णालयाचे एचओडी न्यूरोसर्जरी, एचओडी मेडिसिन आणि कार्डिओलॉजिस्ट यांनी त्यांची तपासणी केली. त्यांची स्थिती गंभीर होती त्यांना स्थिर करावे लागले.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी