Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीNCP Political Crisis : घड्याळ चिन्ह न वापरण्याचा सुप्रीम कोर्टाचा अजित पवार...

NCP Political Crisis : घड्याळ चिन्ह न वापरण्याचा सुप्रीम कोर्टाचा अजित पवार गटाला सल्ला

शरद पवारांचा फोटोही न वापरण्याची केली सूचना

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) फूट पडल्यानंतर अनेक महिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ चिन्ह यावर दोन्ही गटांमध्ये वाद सुरु होता. अखेर बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवार गटाला (Ajit Pawar group) मूळ नाव आणि घड्याळ चिन्ह बहाल केले. तर शरद पवार गटाला (Sharad Pawar group) तुतारी हे नवे चिन्ह दिले. मात्र याविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. आज या प्रकरणी सुनावणी पार पडली असून सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह न वापरण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच शरद पवारांचे फोटोही न वापरण्याची सूचना केली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीदरम्यान, अजित पवार हे आमच्या लोकप्रियतेचा वापर करत असल्याचा दावा शरद पवार गटाने केला. शरद पवार यांचा फोटो आणि घड्याळ चिन्ह वापरण्यावरही त्यांनी आक्षेप नोंदवला. यावर सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचं नाव आणि फोटो तसेच घड्याळ चिन्ह वापरु नका, असे आदेश अजित पवार गटाला दिले आहेत.

काय म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाने?

सुनावणीवेळी शरद पवार यांच्या नावाचा व छायाचित्राचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही, असे हमीपत्र दाखल करण्यास न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले. त्याचबरोबर अजित पवार गटाने निवडणुकीसाठी ‘घड्याळ’ या चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह वापरावे, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही, असेही न्यायालयाने तोंडी सुचवले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचं नाव आणि चिन्ह वापरणार नाही असं लेखी देण्याचे निर्देश अजित पवार गटाला दिले आहेत. यावर शनिवारी आम्ही प्रतिज्ञापत्र सादर करू, असे अजित पवार गटाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार १८ मार्च रोजी होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -