IPL 2024: विराट कोहली मैदानात कधी परतणार? तारीख आली समोर

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली मैदानात दिसत नाहीये. तो पुन्हा एकदा बाबा झाला आहे. विराट आणि अनुष्काच्या घरी नुकतीच पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. मुलाच्या जन्मामुळे त्याने इंग्लंड मालिकेतूनही आपले नाव मागे घेतले होते. तो लोकांच्या नजरेपासूनही दूर आहे. अशातच असा सवाल केला जात आहे की तो आयपीएल खेळणार की नाही? आणि जर खेळणार असेल तर कधी खेळणार.

विराट कोहली १९ मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला जॉईन करू शकतो. कारण या तारखेला टीमचा अनबॉक्स शो असेल. कोहली शेवटचा अफगाणिस्तानविरुदध खेळवण्यात आलेल्या टी-२० मालिकेत दिसला होता. त्यानंतर तो लंडनच्या रस्त्यांवर दिसला होता.

 



दरम्यान, आरसीबी अथवा विराट कोहली यांनी कोणीही कन्फर्म केलेले नाही की तो १९ मार्चला संघासोबत दिसेल की नाही. याशिवाय याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही की कोहली आयपीएल २०२४मध्ये खेळणार की नाही. कारण तो बऱ्याच दिवसांपासून दिसलेलाही नाही.

आयपीएलनंतर टी-२० वर्ल्डकप २०२४ खेळवला जाणार आहे. यातही कोहलीच्या निवडीवर सवाल केले जात आहे. असे म्हटले जात आहे की त्याला टी-२० वर्ल्डकप संघापासून दूर ठेवले जाऊ शकते.
Comments
Add Comment

Cristiano & Georgina : फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि जॉर्जियाना रॉड्रिगेझ अडकणार लग्नबेडीत; मादेरा येथे रंगणार सोहळा

फुटबॉल जगतातील लोकप्रिय तारा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची पार्टनर, मॉडेल जॉर्जियाना रॉड्रिगेझ यांच्या

IND vs SLA Test Series Sai Sudharsan : साई सुदर्शन सराव सामन्याला मुकणार, पण...; पहिल्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला दिलासा

India vs Sri Lanka Test Series : भारताच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी युवा फलंदाज साई सुदर्शन (Sai Sudharsan) याच्या दुखापतीमुळे चाहत्यांची

Rohit Sharma Selection Controversy : रोहित शर्माच्या निवडीवरून BCCI विरुद्ध निवड समिती? आगरकर कोंडीत; पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे?

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वरिष्ठ खेळाडूंच्या निवडीवरून चर्चांना उधाण आले आहे. रोहित शर्माच्या (Rohit

ICC ODI World Cup : आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : पुरुषांच्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. स्पर्धा सुरू

Sunil Gavaskar on Ajinkya Rahane : 'अजिंक्य रहाणेला कधीच योग्य श्रेय मिळालं नाही'; रहाणेच्या निवृत्तीनंतर सुनील गावसकर भावुक, राहुल द्रविडशी केली तुलना

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आंतरराष्ट्रीय

Brock Lesnar : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. समरस्लॅमच्या मुख्य