Loksabha Election : 'या' दिवसापासून लागू होणार आचारसंहिता 

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या बैठकीची तारीख ठरली


नवी दिल्ली : देशातील सर्वांच्याच नजरा महत्त्वपूर्ण अशा लोकसभा निवडणुकीकडे (Loksabha Election) लागल्या आहेत. राजकीय पक्षदेखील (Political parties) यासाठी कंबर कसून तयारी करत आहेत. त्यातच आता यासंबंधी निवडणूक आयोगाच्या (Election Commission Of India) महत्त्वाच्या बैठकीची तारीख ठरली आहे. १५ मार्च रोजी ही बैठक पार पडणार असून १८ मार्चनंतर आचारसंहिता (Code of conduct) लागू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर निवडणुका (Lok Sabha Election Date) जाहीर होतील. तसेच १५ मार्चच्या बैठकीमध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.


देशातील लोकसभेच्या निवडणुका या १८ मार्च किंवा त्यानंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक ही शुक्रवारी १५ मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवारी सुट्टी असून सोमवारी किंवा त्यानंतर म्हणजे १८ मार्चनंतर आचारसंहिता लागू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.



निवडणूक आयुक्तांच्या रिक्त जागा भरणार


निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे यांनी घेतलेली निवृत्ती आणि निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाच्या निवडणूक आयुक्तांच्या दोन जागा रिक्त झाल्या. या दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भात १५ मार्चच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.


केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या नियुक्ती संदर्भात समिती स्थापन करण्यात येणार आहे. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी पाच नावांचे दोन स्वतंत्र पॅनेल तयार करण्यात येणार आहे. या समितीमध्ये गृह सचिव आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे (DOPT) सचिव यांचा समावेश असेल. केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती, निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्तीसाठी दोन व्यक्तींची नावे देईल. त्यानंतर राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतील.


Comments
Add Comment

ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्ट ४ नोव्हेंबरला होणार लाँच

मुंबई : ह्युंदाई मोटर इंडिया आपल्या लोकप्रिय एसयूव्ही व्हेन्यूचे दुसऱ्या पिढीचे मॉडेल ४ नोव्हेंबर रोजी भारतीय

घरूनच भरता येणार शाळेची फी ! केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नवीन घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यांना पारदर्शकता सुधारण्यासाठी आणि पालकांसाठी सोयी

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी

करूर चेंगराचेंगरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा १३ ऑक्टोबरला निर्णय

चेन्नई : करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर १३ ऑक्टोबर रोजी

सर्वसामान्यांसाठी नवा परवडणारा 5G स्मार्टफोन, सॅमसंग गॅलेक्सी M17 5G

सॅमसंग गॅलेक्सी M17 5G फक्त ₹12,499 पासून, दमदार फीचर्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स  मुंबई : सॅमसंगने भारतात आपला

अतिरेक्यांना पकडण्याची ती पद्धत चुकली, चिदंबरम यांचे धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली : अतिरेकी भिंद्रनवाला आणि समर्थक शस्त्रसाठा घेऊन शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात लपले होते. या