BCCIने कसोटी क्रिकेटर्सची वाढवली सॅलरी, आता एका सामन्यासाठी मिळणार इतके लाख रूपये

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा पगार वाढवण्याचा प्लान केला आहे. बोर्डाने कसोटी खेळाडूंसाठी इन्सेटिव्ह स्कीम लागू केली आहे. आता एका हंगामात ७५ टक्के कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूला एका सामन्यासाठी तब्बल ४५ लाख रूपये मिळतील. तर एका हंगामात ५० ते ७४ टक्के सामने खेळणाऱ्या खेळाडूला प्रति सामन्यासाठी ३० लाख रूपये मिळतील.


धरमशाला कसोटीत टीम इंडियाच्या विजयानंतर सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली. एका कसोटी खेळाडूला जो हंगामात १० कसोटी सामन्यात भाग घेत असेल तर त्याला प्रोत्साहन म्हणून ४.५० कोटी रूपयांची मोठी रक्कम मिळेल. सोबतच वरिष्ठ क्रिकेटर्सना वार्षिक केंद्रीय कराराअंतर्गत रिटेनर फीही मिळेल.


अनुभवी क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव यांना या वर्षी कॉन्ट्रॅक्ट मिळालेले नाही तर त्यांना गेल्या सत्रासाठी प्रोत्साहन राशी दिली जाईल. जय शाह म्हणाले मंडळ २०२२-२३ आणि २०२३-२४ साठी तब्बल ४५ कोटी रूपये खर्च करणार आहे.


बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पत्रकारांशी बातचीत करताना म्हटले की या योजनेमुळे खेळाडूंची इंडियन प्रीमियर लीगच्या कॉन्ट्रॅक्टपेक्षा अधिक कमाई होईल. आयपीएल हे महत्त्वाचे आहेच मात्र द्विपक्षीय क्रिकेटही तितकेच महत्त्वाचे आहे. यात एकूण ४५ कोटी रूपये खर्च होतील.


उदाहरणार्थ, भारताचा कर्णधार रोहित शर्माने २०२३-२४ या हंगामात सर्व १० कसोटी सामने खेळले आहेत त्यामुळे टेस्ट क्रिकेटला प्राथमिकता देण्यासाठी १.५ कोटी रूपये मॅच फीमिळेल. सोबतच त्याला ४.५ कोटी रूपयेही मिळतील. अशातच कसोटी क्रिकेटमधून त्याची कमाई ६ कोटी रूपये झाली. सोबतच त्याची वार्षिक कमाई ७ कोटी रूपये यात जोडल्यास एकूण कमाई १३ कोटी रूपये होईल.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे