भ्रष्टाचार, लाचखोरीला संसदीय विशेषाधिकाराचे संरक्षण नाही; ‘वोट फॉर नोट’प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय!

सभागृहात पैसे घेऊन मतदान केल्यास सुटका नाही


लोकप्रतिनिधींविरोधात चालणार खटले


नवी दिल्ली : संसद किंवा विधीमंडळ सभागृहात भाषण करण्यासाठी, मत देण्यासाठी खासदार आणि आमदार लाच घेत असतील तर त्यांना कायद्याचे संरक्षण द्यावे का? सुप्रीम कोर्टाने याबाबत एक मोठा निर्णय दिला आहे. मताच्या बदल्यात पैसे देण्याबाबत सुप्रीम कोर्टाकडून हा ऐतिहासिक निकाल देण्यात आला असून १९९८ च्या नरसिंह राव प्रकरणातील आपला निकाल बदलून आमदार खासदारांना लाचखोरी आणि भ्रष्टाचार प्रकरणी कायदेशीर संरक्षण देण्यास नकार दिला आहे.

‘वोट फॉर नोट’ प्रकरणी सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी तसेच विधेयकांच्या बाजूने मतदान करण्यासाठी लाच घेणाऱ्या आमदार खासदारांचा बचाव करणारा कायदा रद्द करण्यात आला आहे. याआधी लाच घेऊन मतदान करणाऱ्या खासदार किंवा आमदारांवर कारवाई करता येणार नाही, असा निकाल १९९८ मध्ये देण्यात आला होता. हाच निकाल आता सुप्रीम कोर्टाने फिरवला आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय बदलला आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सात सदस्यीय घटनापीठाने एकमताने सोमवारी हा निकाल दिला. त्यामुळे आता या गुन्ह्यासाठी लोकप्रतिनिधींना कोणतीही सूट दिली जाणार नाही.

‘नरसिंहरावांच्या निर्णयाचा अर्थ कलम १०५/१९४ च्या विरोधात आहे. त्यामुळे लाचखोरीला संसदीय विशेषाधिकारांचे संरक्षण नाही’ असे सरन्यायाधीशांनी हा निकाल देताना म्हटले आहे. २६ वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने १९९८ च्या निर्णयाचा आढावा घेतला आहे.

या एकमताने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयात, सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने विधिमंडळाच्या सदस्याने केलेला भ्रष्टाचार किंवा लाचखोरी सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा भंग करते. लाचखोरीला कोणत्याही संसदीय विशेषाधिकाराचे संरक्षण नाही, असे स्पष्ट केले होते.

पंतप्रधान मोदींनी केले निर्णयाचे स्वागत

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार स्वागत केले आहे. यासाठी चक्क ट्विट करत त्यांनी म्हटले आहे की, स्वागतम! सन्माननीय सुप्रीम कोर्टाने हा खूपच चांगला निर्णय दिला आहे. यामुळे स्वच्छ राजकारणाची खात्री मिळेल अन् लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ होईल.

 
Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला