LPG Price Hike: मार्चच्या पहिल्याच दिवशीच झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ

नवी दिल्ली: मार्च महिन्याची सुरूवात झाली आहे आणि महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ मार्चला एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. म्हणजेच १ मार्च २०२४ ला सिलेंडर महाग झाला आहे. दरम्यान, ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी किंमतीतील ही वाढ कर्मशियल गॅस सिलेंडरच्या दरात केली आहे. दिल्लीमध्ये २५ रूपये तर मुंबईमध्ये सिलेंडरच्या किंमतीत २६ रूपयांनी वाढ झाली आहे.

ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात १९ किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत वाढ करत महागाईचा आणखी एक झटका दिला आहे. गेल्या महिन्यात बजेटच्या दिवशी १ फेब्रुवारी २०२४ला १४ रूपयांची वाढ केली होती. त्यानंतर आता २५ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. IOCL च्या वेबसाईटवर बदललेले दर जाहीर करण्यात आले आहेत. १ मार्च २०२४ म्हणजेच आजपासून हे नवे दर लागू आहेत.

नव्या दरानुसार राजधानी दिल्लीत कर्मशियल सिलेंडर १७९५रूपयांना मिळेल. तर कोलकातामध्ये हा सिलेंडर १९११ रूपयांना मिळेल. मुंबईमध्ये कमर्शियल सिलेंडरची किंमत वाढून १७४९ रूपये तर चेन्नईमध्ये १९६०.५० रूपये झाली आहे.

फेब्रुवारीमध्ये होती इतकी किंमत


याआधी या बदलाआधी दिल्लीमध्ये १९किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत १७५५.५० रूपयांनी वाढून १७६९.५० रूपये झाली होती. इतर महानगरांमध्ये बोलायचे झाल्यास कोलकातामध्ये एका सिलेंडरची १८६९ वरून १८८७ रूपये झाली होती. मुंबईमध्ये आधी जो कमर्शियल सिलेंडर १७०८ रूपयांना मिळत होता तो १७२३ रूपये झाला होता. तर चेन्नईमध्ये याची किंमत १९२४.५० रूपयांवरून १९३७ रूपये झाली होती.
Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या