Shreyas Talpade : श्रेयस तळपदेच्या 'ही अनोखी गाठ' चित्रपटाच्या तिकीटावर एक खास ऑफर!

उद्यापासून होणार सर्वत्र प्रदर्शित


मुंबई : महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) दिग्दर्शित 'ही अनोखी गाठ' (Hee Anokhi Gath) या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. याचं कारण म्हणजे नुकताच हृदयविकाराच्या झटक्यातून सावरलेला अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या जोडीला गौरी इंगवले (Gauri Ingawale) प्रमुख भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट उद्यापासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार असून चित्रपटाच्या तिकीटावर एक खास ऑफर देण्यात आली आहे. या चित्रपटाच्या एका तिकीटावर एक तिकीट फ्री देण्यात येणार आहे.


'ही अनोखी गाठ' या चित्रपटामधून गौरी आणि श्रेयसची नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. शिवाय आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक भन्नाट ऑफरही जाहीर केली आहे. १ मार्चला एकावर एक तिकीट फ्री अशी ऑफर असणार आहे.


बूक माय शोवर HEAGBOGO हा कूपन कोड वापरुन तुम्ही ही ऑफर वापरु शकता. आपल्या माणसांच्या सोबतीने पाहा, 'ही अनोखी गाठ' ची प्रेक्षकांना १ वर १ फ्री ची स्पेशल ऑफर, मग आजच तिकीट बुक करा, असं कॅप्शन त्यांनी या पोस्टवर दिलं आहे.





महेश मांजरेकर मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित 'ही अनोखी गाठ' या चित्रपटात शरद पोंक्षे, रिषी सक्सेना, दीप्ती लेले, सुरभी भावे हे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाच्या तिकीटावरील ऑफर फक्त १ मार्च या दिवशीच लागू असणार आहे.

Comments
Add Comment

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या