Raj Thackeray : आपण सगळ्याच दृष्टीकोनातून कात टाकणं गरजेचं आहे

मराठी भाषादिनी नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?


मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वत्र आज मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din) साजरा केला जात आहे. त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शन सोहळ्याला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळेस त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी अशा मराठीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.


राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, महाराष्ट्रात साधारणपणे १५ कोटी मराठी लोकसंख्या आहे. दीड-पावणे दोन कोटी बाहेरचे आहेत, बाकी मराठीच आहेत. काही ठराविक नाटकं, चित्रपट सोडले तर प्रेक्षक पाहायला का जात नाहीत? आपण सगळ्याच दृष्टीकोनातून कात टाकणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.


राज ठाकरे यांनी पुढे सांगितलं की, ''जी गोष्ट मला टीव्हीवर मोफत पाहता येते, ती पाहण्यासाठी मी पैसे देऊन चित्रपटगृहात जाणार नाही, त्याव्यतिरिक्त काही मिळालं तर जाईन. हिंदी चित्रपटसृष्टी मोठी वाटते, पण तिथेही दणादण चित्रपट आदळत आहेत, कारण लोकांना तोच-तोचपण नको आहे. जे चित्रपट चालले आहेत, ते सहजासहजी टीव्हीवर पाहता येत नाहीत, त्यामुळे ते चालतात. कात टाकणं आवश्यक आहे.''



नवीन कल्पना, नवीन संकल्पना येणं गरजेचं


राज ठाकरे म्हणाले, नवीन संकल्पना, नवीन कल्पना येणं गरजेचं आहे. त्यासाठी माझ्याकडून जो काही हातभार लागेल, त्या-त्या वेळी मी निश्चितपणे आपल्या पाठीमागे उभा आहे. मराठी भाषा दिन साजरा करणं मी आणि माझ्या पक्षाने २००८ मध्ये सुरु केलं, त्याआधी फक्त मराठी भाषा दिवस होता. आता हा दिवस साजरा होतो, मोठा होतो, तो वाढतोय.



मराठी चित्रपटसृष्टीसाठी लवकरच काहीतरी आणणार


मराठी भाषा, मराठी चित्रपट, मराठी जे जे काही आहे, ते वृद्धिंगत व्हावं हीच मनापासून इच्छा आहे. त्यासाठी जे काही माझ्याकडून होईल, ते करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन आणि त्यासाठी मला गृहीत धरलं तरी चालेल. मराठी चित्रपटसृष्टीसाठीही काहीतरी करण्याचा प्रयत्न लवकरच ते समोर येईल.



'तिकीटालय' ॲप लाँच


दरम्यान, मराठी भाषा दिनानिमित्त 'तिकीटालय' ॲप लाँच करण्यात आलं. मराठी नाटक, चित्रपट आणि कार्यक्रम बुकिंगसाठी तिकिटालय ॲप तयार केलं आहे. इतर ॲपवर मराठी कार्यक्रम कमी असतात. मात्र या ॲपमध्ये सर्व सविस्तर कार्यक्रमाची माहिती आहे.


Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे २४० लोकल फेऱ्या रद्द

काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ