PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा सभामंडप कोसळला!

  108

४ कामगार जखमी; यवतमाळमध्ये घडली दुर्घटना


यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) २८ फेब्रुवारीला यवतमाळ (Yavatmal) दौऱ्यावर येणार असून, त्यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, तत्पूर्वी एक दुर्घटना घडली. या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा सभामंडप आज कोसळला. यात ४ कामगार जखमी झाले आहेत. इतर कामगार सुदैवाने बचावले आहेत. जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळ दौऱ्यासाठी भारी गावात ४५ एकर जागेवर मंडप उभारण्यात येत आहे. मात्र, त्यातील एक डोम उभा करण्याचे काम सुरू असतानाच पिलर जमिनीतून निखळला. त्यामुळे त्याचे खांब खाली क्रेनवर कोसळले. याठिकाणी काही कामगार देखील होते, परंतु कामगार सुदैवाने बचावले असून,चार जण जखमी झाले आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ फेब्रुवारीला यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात ते दोन लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधीत करणार आहेत. या मेळाव्याची जय्यत तयारी केली जात असतानाच हा अपघात घडला. पंतप्रधान मोदी मागील काही दिवसांपासून सतत महाराष्ट्र राज्याचा दौरा करत असून, ते चौथ्यांदा यवतमाळ जिल्हाच्या दौऱ्यावर येत आहेत.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ