मनपाच्या पशु-पक्षी उपचार केंद्राचे लोकार्पण

रेबिजमुक्त मीरा भाईंदरसाठी मोहिमेची सुरुवात


भाईंदर : रस्त्यावरील जखमी मोकाट पशू तसेच पक्षी यांना तात्काळ उपचार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच भटके श्वान, मांजरी यांच्यावर नसबंदी करण्यासाठी मीरा रोडच्या पूनम सागर भागात पशू-पक्षी उपचार केंद्राचे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या केंद्रातून रेबिजमुक्त मीरा भाईंदर मोहीम राबविण्यात येणार आहे.


एमबीएमसीने मीरा रोडच्या पूनम सागर भागात रस्त्यावरील जखमी मोकाट पशू तसेच पक्षी यांना तात्काळ उपचार उपलब्ध व्हावेत तसेच भटके श्वान, मांजरी यांच्यावर नसबंदी करण्यासाठी पशू-पक्षी उपचार केंद्र सुरू केले आहे. तसेच एक सामजिक संस्थेच्या सहकार्याने रेबिजमुक्त मीरा भाईंदर अभियान सुरू करण्यात येणार आहे.


या अभियानाअंतर्गत लसीकरण सुरू करण्यात येणार असून पुढच्या सात दिवसात १५ ते २० हजार मोकाट कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी डॉक्टरांची १० पथके व ४० सहकारी इतके मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे. मोहिमेची सुरुवात अतिरीक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्या हस्ते एका श्वानाचे लसीकरण करून करण्यात आले. याप्रसंगी उपायुक्त रवी पवार, शहर अभियंता दिपक खांबित, पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम निराटले, पशु वैद्यकीय डॉ. शितल भोये व कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Sapne Vs Everyone : प्राइम व्हिडिओने ‘सपने वर्सेस एवरीवन’च्या नवीन सीझनची जागतिक रिलीज डेट १ मे ठरवली

महत्त्वाकांक्षा आणि बदला यावर आधारित एक रोमांचक ड्रामा मुंबई : भारताच्या सर्वाधिक लोकप्रिय एंटरटेनमेंट

Flipkart–Uber Partnership : राईड्सवर मिळणार सुपरकॉइन्स, रिवॉर्ड इकोसिस्टमचा विस्तार

मुंबई : भारतातील प्रमुख ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने देशातील आघाडीचा मोबिलिटी प्लॅटफॉर्म उबरसोबत धोरणात्मक

Dombivali News : पर्यटनासाठी कोकणात गेलेल्या डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

डोंबिवली : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत डोंबिवलीतील २४

Pune Crime : धक्कादायक ! शरीरात दैवी शक्तीचा वास असल्याचं भासवून महिलेवर अत्याचार

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी

Raja Shivaji : आशा भोसलेंच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा, 'राजा शिवाजी' सिनेमाबद्दल रितेशनं घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. या सिनेमाचा

Solapur News : झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि... सख्ख्या भावंडांवर काळाचा घाला

सोलापूर : सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून