Raja Shivaji : आशा भोसलेंच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा, 'राजा शिवाजी' सिनेमाबद्दल रितेशनं घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. या सिनेमाचा धमाकेदार टीझर नुकताच रिलीज करण्यात आला. 'धुरंधर २: द रिव्हेंज' या सिनेमासोबत चित्रपटगृहात 'राजा शिवाजी'चा टीझर दाखवण्यात आला होता. या टीझरचं प्रेक्षकांनी स्वागत केलं. फिल्ममधील रितेश देशमुखचा शिवरायांचा लूक पाहून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असतानाच आता या सिनेमाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.


आज म्हणजेच १२ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण मनोरंजन विश्वाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. संगीतविश्वातील दिग्गज गायिका आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर रितेश देशमुख आणि 'राजा शिवाजी' सिनेमाच्या संपूर्ण टीमनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.


आशा भोसले यांच्या निधनानंतर अभिनेता रितेश देशमुख आणि 'मुंबई फिल्म कंपनी'नं आशा भोसलेंना आदरांजली वाहण्यासाठी सिनेमाच्या बहुप्रतीक्षित 'छत्रपती' अँथमचं प्रदर्शन पुढे ढकललं आहे. टीमनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटलं आहे की, "ज्या स्वरांनी अनेक दशके आपल्या हृदयावर अधिराज्य गाजवलं, ते आज निःशब्द झाले आहेत. आशा भोसले यांच्या जाण्यानं संगीताचा एक सुवर्ण अध्याय संपल्याची वेदना प्रत्येकाच्या मनात दाटून आली आहे. या दुःखद क्षणी, त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करत आम्ही 'राजा शिवाजी' अँथम 'छत्रपती' चं प्रदर्शन पुढे ढकलत आहोत. नवीन तारीख लवकरच कळवू."





रितेश देशमुखनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेला सिनेमाचा टीझर पाहिल्यापासून सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकत वाढली आहे. स्वराज्याची शौर्यगाथा, महाराजांच्या युद्धनीतीची झलक आणि दमदार संवाद यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. हा सिनेमा येत्या १ मे २०२६ रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार आहे.



या सिनेमात रितेश देशमुखचा शिवरायांचा इतिहास जागतिक स्तरावर नेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मानला जात आहे. या सिनेमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्यातील दमदार स्टारकास्ट. या सिनेमात रितेश देशमुख, जेनिलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, फरदीन खान, जितेंद्र जोशी, बोमन इराणी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. विशेष म्हणजे, हा सिनेमा मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Comments
Add Comment

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी