काय आहे चौकशीचं कारण? तानियाने वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी का संपवलं जीवन?
सूरत : सूरत येथील प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंहने (Tania Singh) काल रात्री आपल्या राहत्या घरी आत्महत्या (Suicide) केली. गेल्या दोन वर्षांपासून फॅशन डिझायनिंग (Fashion designing) आणि मॉडेलिंग (Modeling) या क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या तानियाने वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी आपलं जीवन संपवल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. या प्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात आयपीएलच्या सनरायजर्स हैदराबाद (IPL Sunrisers Hyderabad) टीममधील खेळाडू अभिषेक शर्माचं (Abhishek Sharma) नाव समोर आलं आहे. याचं कारण म्हणजे तानियाच्या मृत्यूपूर्वी शेवटचा कॉल अभिषेकसोबत झाल्याचं निदर्शनास आलं आहे. यामुळे पोलीस अभिषेकची चौकशी करत आहेत.
तानियाच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस यासंदर्भात करत असलेल्या चौकशीदरम्यान तानियाचा फोन चेक करण्यात आला. त्यावेळी आयपीएल स्टार अभिषेक शर्माचा शेवटचा फोन आलेला दिसून आला. त्यानंतर अभिषेक शर्मा अडचणीत आला आहे. प्रेमप्रकरणामुळे तानियाने आत्महत्या केली असल्याचा पोलिसांना संशय आहे.
कोण आहे तानिया सिंह?
तानिया सूरतमधील एक लोकप्रिय फॅशन डिझायनर आणि मॉडेल होती. इंस्टाग्रामवर तिने दहा हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. इंस्टा बायोमध्ये तिने डिस्क जॉकी, मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल असल्याचं लिहिलं होतं. मात्र, तिने कमी वयात आत्महत्या केली.
कोण आहे अभिषेक शर्मा?
अभिषेक शर्मा IPL मधील सनरायजर्स हैदराबाद टीमचा खेळाडू आहे. ऑलराऊंडर अशी त्याची ओळख आहे. आयपीएलमध्ये त्याने कमाल खेळी खेळली आहे. आयपीएलच्या ४७ सामन्यात त्याने १३७.३८ सरासरीनुसार ८९३ रन बनवले आहेत. २०२२ मध्ये अभिषेकला आयपीएल ऑक्शनमध्ये सनरायजर्स हैदराबादने साडे सहा कोटी रुपयांत विकत घेतले होते.