Shivrajyabhishek din : दांडपट्ट्याला मिळणार राज्यशस्त्राचा दर्जा; सुधीर मुनगंटीवार यांनी दिली माहिती

शिवराज्याभिषेक दिनाचा निवडला मुहूर्त


मुंबई : यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्यभिषेकाचे ३५०वे वर्ष आहे. या ३५० व्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जात आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) लंडनच्या संग्रहालयातून वाघनखे आणण्याचाही प्रयत्न करत आहेत. यानंतर शिवराज्याभिषेक दिनी (Shivrajyabhishek) एक मोठी घोषणा करण्यात येणार आहे. दांडपट्टा (Dandapatta) या महत्त्वपूर्ण शस्त्राला राज्यशस्त्राचा दर्जा देण्यात येणार आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात साजरी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे किल्ले शिवनेरीवर शासकीय कार्यक्रम होईल. तर राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रात्री आठ वाजता आग्र्याच्या लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व अजित पवार (Ajit Pawar), सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत.


आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा औरंगजेबाने भरदरबारात अपमान केला. त्याच दरबारात येत्या सोमवारी 'जय शिवाजी-जय भवानी'च्या घोषणांचा जयघोष होईल आणि शिवजयंतीच्या निमित्ताने ऐतिहासिक दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात येईल. दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे, असं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.



कसा असतो दांडपट्टा?


दांडपट्टा किंवा पट्टा हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले तलवारीसारखे पात्याचे शस्त्र आहे. सहसा यामध्ये लांबलचक, सरळसोट आकाराचे, पोलादापासून बनवलेले पाते आणि मुठीवर चढवता येणारे चिलखत जोडलेले असते. चिलखत पंजा, मूठ व कोपरापर्यंतचा हात झाकेल, अश्या बनावटीचे असते. जवळच्या अंतरावरून हातघाईच्या लढाई लढताना याचा वापर केला जाई. विशेषतः मराठ्यांच्या पायदळाने अनेक युद्धमोहिमांत याचा परिणामकारक वापर केला.


Comments
Add Comment

शेतकऱ्याच्या ४ लाखांच्या चेक घोटाळ्याची पोलिसांत नोंद, बँक ऑफ महाराष्ट्रच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह

सोलापूर : बार्शी तालुक्यातील शेतकरी उत्तम दत्तात्रय जाधव यांच्या ४ लाख रुपयांच्या चेकचोरी प्रकरणात अखेर बँक ऑफ

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, भिडे पुलाबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

पुणे : मेट्रोच्या कामांमुळे बंद ठेवलेला भिडे पूल आता वाहतुकीकरिता सुरू करण्यात आला आहे. शनिवार ११ ऑक्टोबरपासून

खामला निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश, महसूलमंत्र्यांच्या धाडीनंतर अधिकारी निलंबित

नागपूर : राज्यातील नोंदणी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी अनेक वेळा समोर आल्या आहेत. नागपूरच्या खामला

Kondhwa Search Operation : एटीएसचा कोंढव्यात शिरकाव! गल्लीबोळामध्ये झळकले आय लव मोहम्मदचे बॅनर, पोलीस तपास सुरू

पुणे : पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसर आज पहाटेपासूनच तपास यंत्रणांच्या छापामारीमुळे चर्चेत आला आहे. तपास यंत्रणांची

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या