Friday, May 9, 2025

कोकणमहाराष्ट्रताज्या घडामोडीसिंधुदुर्ग

कुडाळमध्ये ‘पीएनजी ज्वेलर्स’चे नवीन दालन सुरू

कुडाळमध्ये ‘पीएनजी ज्वेलर्स’चे नवीन दालन सुरू

केंद्रीय मंत्री नारायण राणे, सौ. निलमताई नारायण राणे यांनी केले उद्घाटन


कुडाळ : महाराष्ट्रातील प्रतिष्ठित ज्वेलरी ब्रँड असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’ तर्फे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या कुडाळ शहरात एका नवीन दालनाचे गुरूवारी केंद्रीय सूक्ष्म, लघू, आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि सौ. नीलमताई नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. १२०० चौरस फुटांच्या विस्तृत जागेतील या भव्य दालनाच्या उद्घाटन समारंभाला लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, सारस्वत बँकेचे संचालक सुनील सौदागर यांच्यासह ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ, कार्यकारी संचालक पराग गाडगीळ आणि पीएनजी ज्वेलर्स परिवारातील सदस्य उपस्थित होते.



‘पीएनजी ज्वेलर्स’ने कुडाळ येथील दालनाच्या शुभारंभासह आणखी एक महत्वाचा टप्पा पार करत ब्रँडने आपल्या मौल्यवान ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाचे दागिने आणि अतुलनीय सेवा प्रदान करण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या या नवीन दालनात विविध आणि उच्च दर्जाच्या उत्पादनांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचा एक अप्रतिम संग्रह प्रदर्शित करण्यात आला आहे. या दालनामध्ये नववधुकरीता नवीन प्रथा कलेक्शन देखील उपलब्ध असेल. ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, कुडाळ येथे नवीन दालन सुरू करणे हा आमच्यासाठी अत्यंत आनंददायी क्षण असून पीएनजी ज्वेलर्सच्या प्रवासात अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. हा विस्तार म्हणजे या भागातील ग्राहकांच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी टाकलेले एक पाऊल आहे. कुडाळ येथील दालनाच्या उद्घाटनाचा एक भाग म्हणून ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २० टक्क्यांपर्यंतची सवलत आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.

Comments
Add Comment