Cyber crime : पार्टटाइम जॉबचे आमिष सायबर भामट्याच्या शोधात पोलीस


  • गोलमाल : महेश पांचाळ


आपल्याला पार्टटाइम जॉबमध्ये स्वारस्य आहे का? असे विचारणारा व्हॉट्सॲप कॉल हा दक्षिण मुंबईतील एका फूड स्टॉलच्या मालकाला आला होता. स्टॉलवर काम करताना मोबाइलवरून जर पार्टटाइम धंदा करण्याची संधी मिळत असेल तर काय वाईट आहे, असा विचार या मालकाच्या मनात आला. प्रयत्न करायला हरकत नाही, असे समजून त्याला पाठवण्यात आलेल्या एक लिंकवर काम करायचे, असे फूड स्टॉल मालकाने ठरविले. त्या लिंकमध्ये अनेक हॉटेल्सची माहिती होती आणि त्याला रेटिंग देण्यास सांगण्यात आले होते. रेटिंग दिल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन त्याच व्हॉट्सॲप नंबरवर परत पाठवण्यास सांगण्यात आले होते. “स्टॉल मालकाने सूचनांचे तंतोतंत पालन केले आणि हॉटेलला रेटिंग दिल्यावर आणि त्याच नंबरवर त्याचा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर सुरुवातीला त्याला १५० रुपये मिळाले. त्यानंतर तो इतर हॉटेलांना रेटिंग देत होता. त्या बदल्यात त्याला दीडशे रुपयांपासून दोन हजार ८०० रुपये मिळाले. स्टॉल मालकाला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडण्यात आले होते. या ठिकाणी संशयित अनोळख्या व्यक्तींकडून त्याला प्री-पेड कामांमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले आणि प्रतिदिन तीन हजार रुपये ते चार हजार रुपये नफा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले होते. स्टॉल मालकाने अवघ्या पाच दिवसांत टेलिग्रामवर सांगितलेल्या चार वेगवेगळ्या बँक खाते क्रमांकावर ११ लाख रुपये ट्रान्सफर केले. एवढी मोठी रक्कम गुंतवणूक करूनही पुढील दोन-तीन दिवसांत नफा मिळू शकला नाही, तेव्हा स्टॉल मालकाला संशय आला. त्याने चौकशी करण्यास सुरूवात केली. पैसे परत मिळविण्यासाठी त्याला आणखी पैसे गुंतवण्यास सांगितले होते; परंतु कोणतेही समाधानकारक उत्तर किंवा पैसे मिळाले नाहीत म्हणून त्याचा संशय अधिक बळावला आणि त्याने पोलिसांकडे धाव घेतली. रितसर तक्रार नोंदविण्यात आली. सहपोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक देवराज बोरसे यांच्या नेतृत्वाखालील एक पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. जास्त नफ्याचे आमिष दाखवून ११ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या त्या सायबर फसवणूक करणाऱ्या भामट्याचा पोलीस शोध घेत आहेत.



सध्या ऑनलाइनचा जमाना आहे; परंतु काळजी घेतली नाही, तर मोठा फटका बसू शकतो, हे विसरून चालणार नाही. सायबर भामटे विविध माध्यमांतून फसवणूक करण्याचे काम करत आहेत. यासंदर्भात गुन्हे वाढत असताना अटक झालेल्यांची संख्या मात्र नगण्य आहे. कधी ‘वर्क फ्रॉम होम’ देत असल्याचे आमिष देत फसवणूक होते केव्हा पार्टटाइम जॉबच्या नावावर फसवले जाते. मुंबईत नव्हे, तर महाराष्ट्रात असे अनेक गुन्हे घडत आहे. त्यामुळे आमिषाला बळी न पडता सायबर ठगांपासून जनतेने सावध असायला हवे.



maheshom108@ gmail.com

Comments
Add Comment

पुस्तकांनी असे घडवले

स्मृतीगंध : लता गुठे नुकताच पुस्तक दिन सर्वांनी साजरा केला. १९७२ ची गोष्ट. मी बालवाडीत जात होते. त्यावेळी

'देऊळ' पुन्हा उघडतंय...

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सतत काही ना काही घडत असते आणि त्यायोगे हे क्षेत्र कायम 'समथिंग हॅपनिंग' या पद्धतीत

इथे सगळेच रंगकर्मी...

राजरंग : राज चिंचणकर ट्यगृहात सर्वसाधारणतः रंगमंच आणि प्रेक्षागृह, असे दोन भाग असतात. रंगमंचावर रंगकर्मी नाटक

ग्रिप्समधल्या उत्क्रांतीवादाचे माकडचाळे

पाचवा वेद : भालचंद्र कुबल परीक्षा संपल्यात, सुट्ट्या सुरू झाल्यात आणि बालनाट्याचा सीझन सुरू झालाय. मे महिना आणि

‘बिग बॉस’चा प्लॅटफॉर्म मला मिळाला!

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  कलर्स वाहिनीवरील बिग बॉस मराठी ६ ची विजेती तन्वी कोलते ही तिच्या परखड बोलण्यामुळे

अश्वत्थाम्याच्या वेदनेवर रंगभाषेची फुंकर...

राजरंग : राज चिंचणकर महाभारत या महाकाव्यात जीवनाचे संपूर्ण सार सामावले आहे, असे म्हटले जाते. हजारो वर्षे उलटली