Manoj Jarange Patil : साल्हेर किल्ल्याजवळ माझ्यासोबत घातपाताचा प्रकार

  123

आजपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरु करताना मनोज जरांगेंनी सांगितला 'तो' प्रसंग


जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) सुरु असलेल्या आंदोलनाला महिने उलटले तरी समाधानकारक निर्णय हाती आलेला नाही. याबाबत राज्य सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारच्या अध्यादेशाचा मराठा समाजाला जोपर्यंत लाभ होत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.


विशेष म्हणजे आपले उपोषण आता कठोर असणार असून, या काळात आपण ना पाणी घेणार, ना उपचार घेणार अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. मराठा समाजाला सरकारने दिलेल्या राजपत्रित अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी आपण उपोषण करत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. याचवेळी बोलतांना जरांगे यांनी आपल्या अंगावर गाडी घालून, अपघात झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी त्या वाहनचालकाला ताब्यात देखील घेतले होते, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ओएसडी यांना माहिती दिली असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.



मनोज जरांगेंनी सांगितला 'तो' घातपाताचा किस्सा


मनोज जरांगे म्हणाले की, 'आम्हाला भीती असून देखील आम्ही सांगत नाही. आमच्यासोबत ७ वेळा अशा घटना घडल्या, मात्र याबाबत आम्ही कुठेच जाही सांगत नाही. साल्हेर किल्ल्याजवळ आमच्या गाडीवर टेम्पो आला होता, पण आम्ही सरंक्षणाची मागणी केली नाही. तसेच आमच्यासोबत घातपाताचा प्रकार घडला म्हणून देखील कुठे सांगितले नाही', हे बोलताना जरांगेंचा रोख छगन भुजबळांकडे होता.


पुढे ते म्हणाले, आम्ही साल्हेर किल्ल्यावर गेलो होतो. सर्व गाड्या खाली लावण्यात येतात. मात्र, वरती अचानक कुठूनतरी एक पिकअप तिथे आले. मला त्यावेळी ते लक्षात आले नाही. पण दर्शन करत असतांना पोलीस लवकर चला म्हणून गरबड करत असल्याने मला शंका आली. त्यामुळे खाली काहीतरी घडलं असल्याचे मला जाणवले. पण पोलिसांनी नेमकं काय घडलं याबाबत मला कळूच दिले नाही. पण, पिकअप सारखी एक गाडीचे ब्रेक खराब झाले म्हणून जोरात वरून खाली आली. प्रचंड वेगाने आलेली ही गाडी आमच्या अंगावर आली असती तर आमचा भुगा झाला असता. पण एकाने जोराने आवाज दिल्याने लोकं उड्या मारून बाजूला पडले.


पोलिसांनी त्या गाडीच्या चालकाला पकडले असता, त्याने कोणाचातरी नवा घेऊन मला पिकअप घालण्याचे सांगण्यात आल्याचं म्हटले. हा सर्व प्रकार खरं आहे की खोटा आहे याबाबत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडीकडे केली असल्याचे जरांगे म्हणाले.

Comments
Add Comment

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे