नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) शुक्रवारी नव्या संसद भवनाच्या कँटीनमध्ये विविध खासदारांसह दुपारचे जेवण केले. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी खासदारांसह आपले अनुभव शेअर केले.
पंतप्रधान मोदींसोबत लंच करणारे खासदार आणि केंद्रीय मंत्री एल मुरूगन यांनी यादरम्यान दावा केला. त्यांनी मीडियाशी बोलताना मुरुगन म्हणाले, आजचा दिवस स्पेशल ठरला. आठ खासदारांना पंतप्रधान मोदींसोबत लंच करण्याची संधी मिळाली. हे खासदार विविध पक्षांचे होते. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या दिनचर्येबद्दल सांगितले की ते केवळ ३.३० तास झोपतात.
एल मुरूगन पुढे म्हणाले की पंतप्रधान मोदींनी सांगितले की ते संध्याकाळी ६ नंतर जेवण करत नाही. आमच्या जेवणात पनीरची भाजी, डाळ, भात, खिचडी आणि तिळाची मिठाई होती. लंचनंतर पंतप्रधान मोदींनी बिल दिले.
खरंतर, पंतप्रधान मोदींसोबत लंच करणाऱ्यांमध्ये बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा, रिव्हॉल्यूशनरी सोशलिस्ट पार्टीचे एनके प्रेमचंद्रन, तेलुगु देशम पार्टीचे राम मोहन नायडू, बहुजन समाज पार्टीचे रितेश पांडे आणि हीना गावितसह भाजपच्या काही नेत्यांसोबत दुपारचे जेवण केले.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले, दुपारी शानदार जेवणाचा आनंद घेतला. विविध पक्ष आणि भारताच्या विविध भागांतील खासदारांनी हे आणखी खास बनवले. त्यांना धन्यवाद..
पंतप्रधान मोदींनी यासोबत लंचदरम्यानचे काही फोटोही शेअर केले. संसदेचे हिवाळी अधिवेशन सत्र शनिवारी संपत आहे. एप्रिल मेमध्ये संभाव्य लोकसभा निवडणुकीच्या आधी संसदेचे हे शेवटचे अधिवेशन आहे.