केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार येणार !

महाड( संजय भुवड) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुती सरकारच्या दोन वर्षाच्या काळात महाड शहरासह संपूर्ण मतदार संघात ५०० कोटीहून अधिक विकास कामे झाली असून या विकास कामांच्या जोरावरच महाड विधानसभा मतदार संघात आपण विजयाचा चौकार लगावणार असा आत्मविश्वास व्यक्त करीत केंद्रात व राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवलेली विकास कामे पाहता केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार येणार असा विश्वास आ. भरतशेठ गोगावले यांनी महाड मधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला आयोजित कृतज्ञता मेळाव्यात व्यक्त केला.तर शिवसेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी महाड नगर परिषदेवर भगवा फडकवणे हे एकच लक्ष्य असून त्यादृष्टीने कामाला लागण्याचे आवाहन शिवसेना आणि युवासेना कार्यकर्त्याना केले.


याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्क प्रमुख अरुण चाळके, माणगांवचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, ॲड राजेंद्र साबळे, सहसंपर्क प्रमुख माजी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, जितेंद्र सावंत, संजय कचरे, विपुल उभारे, महाड तालुका प्रमुख सुरेश महाडीक, निलेश अहिरे, महिला आघाडी प्रमुख विद्या देसाई, माजी सभापती सपना मालुसरे,शहर प्रमुख डॉ. चेतन सुर्वे, शहर संघटक सिध्देश पाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी विकास गोगावले यांनी आमदार गोगावले यांनी दोन दिवसापूर्वी मतदार संघातील जनतेला हाक दिली आणि मोठ्या संख्येने जनता छ. शिवाजी महाराज चौकात जमा झाले त्यामुळे मैदान भरणे ही आ. गोगावलेंसाठी मोठी गोष्ट नाही. महाडची जनता आमदार गोगावलेंच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले. काही बाकी राहीले म्हणून आता विरोधक भरतशेठ यांच्या नॅपकीनवर टिका करू लागले आहेत. आम्ही आजही उद्धव साहेबांचा आदर राखून आहोत मात्र जर विरोधकांनी आपली पातळी सोडली तर त्यांचे वस्त्रहरण केल्याखेरीज राहणार नाही असे आव्हान विकासशेठ यांनी दिले.


जुलै २०२१ च्या महापूरात महाड शहर, तळेगाव, बिरवाडी अडचणीत असताना तत्कालीन नगरविकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूतासारखे धावून आले हे महाडकर जनता विसरणार नाही. आमचा विरोध उध्दव ठाकरेंना नव्हता, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ते बसले आणि शिवसेनेची गळचेपी होत राहीले म्हणून उठाव केला गेला असे सांगत ज्या भरतशेठनेच रायगडच्या भगव्याची शान राखली त्यांना तुम्ही गद्दार म्हणता आणि कॉग्रेसमधून राष्ट्रवादीत, तेथून पुन्हा काँग्रेस आणि आता उबाठात यांना घेऊन तुम्ही डोक्यावर घेऊन नाचता असा सवाल करीत या जनता जनार्दनाचा आशिर्वाद भरतशेठ यांच्या पाठीशी आहे तोपर्यत आ. गोगावले यांना कुणी हरवू शकत नाही असा विश्वास व्यक्त केला. महाड नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचाच पण त्यापूर्वी शिवसेनेचे एक शिष्टमंडळ नेऊन गेल्या १० ते १५ वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करावी.


महाड पालिकेचा बजेट १० कोटीवरून २० कोटीवर कसा गेला याचीही चौकशी करणार असल्याचे सांगितले. माजी खासदार अनंत गीते यांचेवर टिका करताना ज्या कुणबी समाजाने ६ वेळा खासदार म्हणून निवडून दिले त्या कुणबी समाजाची ५ मुले कामाला लावली का? हे जाहीर करावे असे खुले आव्हान दिले. रायगडच्या मातीतील त्यागाचा वारसा जपत ज्यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला ते आमदार गोगावले हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत असे मुख्यमंत्री शिंदे सांगतात त्यामुळे आ. गोगावले सांगतील तेवढा निधी मिळत असतो हे मतदार संघातील जनतेचे भाग्य आहे असे विकासशेठ यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांचा समाचार घेताना त्यांना युवराज म्हणायचे कि पेग्वीन अशी खिल्ली उडवत त्यांचीही या ठिकाणी सभा झाली होती त्यांना आजच्या सभेची गर्दी दाखवा म्हणजे जनता जनार्दन आ. गोगावलेंच्या पाठीशी आहे हे दिसेल असे सांगितले.


यावेळी आ. गोगावले यांनी एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना सावित्री पुल दुर्घटना, महापूर अशा वेळी महाडकरांसाठी मदतकार्यासाठी आपली सर्व यंत्रणा राबवली त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी हा कृतज्ञता मेळावा आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या दोन वर्षात महाड शहरासाठी ६५ कोटीची नळपाणी पुरवठा योजना, डिपीतील रस्त्यासाठी १०५ कोटी असे १७० कोटी तर मतदार संघातील विकास कामांकरीता ५७० कोटी निधी दिला. आपलं सर्वस्व सोडून जे योगदान मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले ते महाडकर जनता विसरणार नाही. विरोधकांनी कितीही टिका केली तरी आपण आपले काम करीत राहायचे गोगावलेंचे संपूर्ण कुटुंब मतदार संघातील जनतेसाठी अहोरात्र चांगले काम करीत आहे त्यामुळे विरोधकांना घाबरण्याचे काम नाही असे सांगत विकास कामांच्या जोरावरच केंद्रात व राज्यात महायुती सरकार आणि महाड मतदार संघात विजयाचा चौकार आपण मारणार असा विश्वास आ. गोगावले यांनी व्यक्त केला.


यावेळी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, उपजिल्हाप्रमुख विजय सावंत, माजी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख सुरेश महाडिक,माजी सभापती सपना मालुसरे, विद्या देसाई यांनी आपले विचार व्यक्त केले. महाड मतदार संघातील शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाचा केक यावेळी कापण्यात आला. तर महाड मधील काही लोकांना घर कुलाचे वाटप करण्यात आले. आ. गोगावले यांचे भाषण सुरु असताना मुख्यमंत्री शिंदे यांचा लाईव्ह कॉल आला त्यावेळी आ. गोगावले यांच्यासह व्यासपीठावरील सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Comments
Add Comment

Tragedy at Nagpur Bachelor Party : मैत्री की क्रूरता? पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून फेकून दिलं; बॅचलर पार्टीचा 'सैतानी' चेहरा समोर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राच्या

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात.

Kolhapur Fire : आजऱ्यात पहाटे अग्नितांडव! ७ गाड्यांसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

आजरा : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास आगीने भीषण रौद्ररूप धारण केले. या आकस्मिक

राज्य सेवा आयोगाची मेगाभरती! जाणून घ्या, अर्जाची शेवटची तारीख, पात्रता आणि जागा

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत चर्चा सुरू असुन भरतीच्या