Mumbai-Goa Highway : सावित्री पुलावर टायर फुटून बसला भीषण आग; सुदैवाने जिवीत हानी नाही

महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Goa Highway) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी (Ratnagiri) येथून मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या औदुंबर छाया ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने अचानक पेट घेतला. बसच्या उजव्या बाजूकडील मागील टायर फुटून आग लागल्याने संपूर्ण गाडी जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


दरम्यान चालकाने प्रसंगावधान राखून गाडीतील १९ प्रवासी व अन्य कर्मचारी मॅनेजरना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान या घटनेची माहिती समजताच महाड एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच एमआयडीसी फायर स्टेशनने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळविले.


याचवेळी या संबंधित कंपनीची रत्नागिरीकडे जाणारी बस या मार्गावर असताना त्या गाडीतून परतीच्या प्रवासासाठी अपघातग्रस्त गाडीतील प्रवाशांना पोलिसांनी बसवून मुंबईला पाठवल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती आंधळे यांनी दिली.


सुमारे सात वर्षांपूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याने झालेल्या दुर्दैवी अपघातामध्ये ४० पेक्षा जास्त प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. काल मध्यरात्री झालेल्या या अपघातानंतर सात वर्षांपूर्वीच्या या कटू आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. या अपघाताच्या घटनेमुळे सावित्री पूल पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला.

Comments
Add Comment

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, प्रशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

सातारा : साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. या

फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, निलंबित PSI बदनेचा शोध सुरू

सातारा : सातारा जिल्हातील फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांना २४ तासांच्या आत आरोपी प्रशांत