या ५ गोष्टी खाण्यास करा सुरूवात, कधीच नाही जाणवणार थकवा

मुंबई: जेवण हे आपल्या शरीरासाठी इंधन असते. फिट राहण्यासाठी जेवण करणे, चांगली झोप, व्यायाम हे गरजेचे आहे. जेवणाबाबत वरिष्ठ आपल्याला एक सल्ला नेहमी देत असतात की नाश्ता हा राजासारखा करावा आणि रात्रीचे जेवण हे नेहमी भिकाऱ्यासारखे असावे.


मात्र अनेकदा भरपेट नाश्ता करूनही काही वेळानंतर पुन्हा थकवा तसेच सुस्ती जाणवायला लागते. आपल्याला लो एनर्जीसारखे वाटते. ही समस्या थंडीच्या दिवसात पुरेसे ऊन न मिळाल्याने होते. अशातच गरजेचे आहे की आपल्या जेवणात एनर्जी बूस्ट करतील अशा खाद्य पदार्थांचा समावेश करणे. यामुळे आपल्याला थकवा जाणवणार नाही आणि कमजोरीही दूर होईल.



प्रोटीन रिच फूड


शरीरासाठी प्रोटीन अतिशय गरजेचे आहे. अशातच तुम्ही नाश्त्यामध्ये प्रोटीनने भरपूर पदार्थांचे सेवन करू शकता. यासाठी तुम्ही पनीर, सोयाबीन, मोड आलेली कडधान्या, डाळी आणि चणे खाऊ शकता. नॉनव्हेज खात असाल तर अंडी आणि कमी मसाल्यातील चिकन खाऊ शकता. याशिवाय केळी-दूध हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे.



कार्ब्स आणि फॅटचा बॅलन्स


लठ्ठपणापासून बचावासाठी कमी फॅट आणि कमी कार्ब्सचे सेवन केले पाहिजे मात्र तुम्ही यासाठी झिरो कार्ब्स आणि झिरो फॅट असलेले डाएट घेत असाल तर हे नुकसानदायक ठरू शकते. तुम्ही नाश्त्यात हेल्दी फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ सामील करू शकता. भाज्यांनी बनवलेले पराठे, अक्रोड, देशी तूप, दही या पदार्थांचा समावेश करू शकता.



पाणी खूप प्या


दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. यामुळे थकवाही दूर होतो. सोबतच पाणी प्यायल्याने तुम्हाला एनर्जीही मिळते. पाणी पिण्यासोबतच रसदार फळे आणि भाज्या खा. नारळ पाणी प्या. दिवसातून एकदा ताक जरूर प्या.



नट्स आणि सीड्स


हाडे मजबूत करण्यासाठी ड्रायफ्रुट्स,नट्स, हेल्दी सीड्सचे सेवन करा. यातून तुम्हाला व्हिटामिन ई, मॅग्नेशियम, प्रोटीन आणि आर्यन मिळेल. भोपळ्याच्या बिया, चिया सीड्स, बदाम, अक्रोड, अंजूर आणि खजूरचे सेवन करा.



व्हिटामिन सीने परिपूर्ण पदार्थ


आपल्या संपूर्ण वाढीसाठी व्हिटामिन सी अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी आवळा, लिंबू, संत्रे आणि हिरव्या भाज्या खा. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. सोबतच हाडे, डोळे आणि त्वचा हेल्दी राहते. शरीराच्या पेशी रिपेअर करण्यासाठी व्हिटामिन सी असलेल्या फूड्सचे सेवन करा.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे