मुंबई : अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) जिवंत आहे. तिच्या निधनाची बातमी २ फेब्रुवारी रोजी समोर आली होती. त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. पण आता निधनाच्या अफवांना पूनम पांडेने पूर्णविराम दिला आहे.
पूनम पांडेने (Poonam Pandey) व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, “तुमच्या सर्वांसोबत मला काही महत्त्वाचं शेअर करायचं आहे आणि ते म्हणजे – मी इथेच आहे, मी जिवंत आहे. मला गर्भाशयाचा कर्करोग (Cervical Cancer) झालेला नाही. परंतु, या रोगाचा सामना कसा करायचा याची माहिती नसल्यामुळे हजारो महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत”.
पूनमने पुढे लिहिले आहे की, “इतर प्रकारच्या कॅन्सरप्रमाणेच, सर्व्हायकल कॅन्सर देखील पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. लवकर या कर्करोगाचं निदान होणं आणि त्यावर HPV लस घेणं हा त्यावरचा उपाय आहे. या आजारामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही, याची खात्री आपण केली पाहिजे. या रोगाबद्दल जागरुकता पसरवून एकमेकांना सशक्त बनवूया आणि प्रत्येक स्त्रीला यावरील उपायांबद्दल माहिती मिळेल, याची खात्री करुया. चला एकत्रितपणे रोगाच्या विनाशकारी परिणामांचा अंत करण्यासाठी प्रयत्न करूया आणि #DeathToCervicalCancer चा अवलंब करुया”.
पूनम पांडेने २ फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने लिहिलं होतं की, “आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी खूपच धक्कादायक आहे. कॅन्सशी झुंझ देणारी आपली लाडकी पूनम आपल्याला सोडून गेली. तिला सर्वायकल कॅन्सर (Cervical Cancer) म्हणजेच गर्भाशयाचा कर्करोग होता, असं तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
पूनम पांडेच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर एकीकडे चाहत्यांना मोठा धक्का बसला तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी हा पब्लिसिटी स्टंट आहे, अशी शक्यता वर्तवली होती. तसेच जागतिक कर्करोग दिनानिमित्त (World Cancer Day) तिने ही पोस्ट केली असेल, असाही अंदाज बांधला जात होता.
आता व्हिडीओ शेअर करत तिने (Poonam Pandey) या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…