Tata Group : परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टाटा समूह पुढे सरसावला

Share

‘इतक्या’ लाखांपर्यंत देणार शैक्षणिक कर्ज

मुंबई : अनेक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण (Foreign education) घेण्याची इच्छा व कुवत असूनही आर्थिक समस्यांमुळे (Financial Problemes) परदेशात जाणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी टाटा समूह (Tata Group) पुढे सरसावला आहे. टाटा समूहातील प्रमुख आर्थिक सेवा कंपनी, टाटा कॅपिटल लि.ने देशात आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शंभर टक्के कर्ज देणारी शैक्षणिक कर्ज योजना (Educational Loan Scheme) दाखल केली आहे.

भारतासह अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जर्मनी, सिंगापूर आणि दुबईमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित, व्यवस्थापन व व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये पदवी, पदव्यूत्तर शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे कर्ज मिळणार आहे. विद्यार्थ्यांना ७५ लाख रुपयांपर्यंतचे तारण मुक्त कर्ज आणि दोन कोटी रुपयांपर्यंतचे सुरक्षित कर्ज किंवा शिक्षणासाठीच्या संपूर्ण खर्चाची रक्कम कर्जरुपाने मिळेल.

टाटा कॅपिटल विद्यार्थ्यांना प्रवेश-पूर्व मंजुरी पत्र देणार आहे, त्यामुळे त्यांना प्रवेश सुरक्षित करण्यासाठी आपली अर्ज प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात मदत मिळेल. स्पर्धात्मक व्याजदरांव्यतिरिक्त टाटा कॅपिटलच्या शैक्षणिक कर्जामध्ये विद्यार्थ्यांना कर्ज परतफेडीचे लवचिक पर्याय मिळणार आहेत, त्यामुळे त्यांना आपल्या अभ्यासाच्या काळात परतफेड करणेही सोपे जाईल. कर्जासाठी ऑनलाइन अर्जही करता येईल, ही प्रक्रियाही सहजसुलभ असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

उच्च शिक्षणाच्या आड येणाऱ्या सामाजिक-आर्थिक अडचणी दूर करण्याचे उद्दिष्ट

या योजनेविषयी माहिती देताना कंपनीचे मुख्य ऑपरेटिंग अधिकारी विवेक चोपडा म्हणाले, विश्वास आणि पारदर्शकता हे नेहमीच आमच्या व्यवसायाचे सर्वांत मजबूत आधारस्तंभ आहेत. पारंपरिक आर्थिक मदतीच्या पलीकडे जाऊन शैक्षणिक कर्जामध्ये ट्युशन फीपासून प्रवास आणि वैद्यकीय खर्चापर्यंतच्या सर्व पैलूंचा समावेश आहे. उच्च शिक्षणाच्या आड येणाऱ्या सामाजिक-आर्थिक अडचणी दूर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या संधी मिळाव्यात अशी आमची इच्छा आहे.

Recent Posts

Jio युजर्सला हवे Unlimited 5G डेटा, इतके रुपयांचा करावा लागेल रिचार्ज

मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…

3 hours ago

IND vs ZIM: अभिषेक-गायकवाडचे वादळ, आवेश-मुकेशचा कहर, झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले

मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…

5 hours ago

१००० कोटीहून अधिक नेटवर्थ…क्रिकेटच नव्हे तर बिझनेसमध्येही हिट धोनी

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…

5 hours ago

Tomato Price Hike : टोमॅटोची ‘लाली’ आणखी वाढणार

नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…

8 hours ago

Ashadhi Ekadashi : आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद!

दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…

8 hours ago

ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी FSSAI ची नवी नियमावली!

आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…

8 hours ago