सुरक्षा सिस्टिममध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराला इस्रायल अँटी ड्रोन सिस्टिमचे सुरक्षा कवच पुरवणार आहे. या सुरक्षा सिस्टिममध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही सुरक्षा यंत्रणा बसवण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी हे सुरक्षा यंत्रणा खरेदी प्रक्रिया पूर्ण केली आहे.
उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच अशा प्रकारे अँटी ड्रोन सिस्टिम अयोध्येतील राम मंदिर परिसरात तैनात केली जाणार आहे. अनेक टप्प्यातील परीक्षणानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी जेव्हा रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला तेव्हादेखील या अँटी ड्रोन सिस्टिमचा वापर करण्यात आला होता.
उत्तर प्रदेश पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा गार्ड, विशेष सुरक्षा समूह आणि इतर सुरक्षा बलांच्या विशेष समन्वयातून मागवण्यात आलं होतं. यापूर्वी दिल्लीत झालेल्या जी २० संमेलनच्या सुरक्षेसाठी अँटिड्रोन सिस्टिमचा वापर केला होता.
अँटी ड्रोन सिस्टिम ही मानवविहरहित हवाई उपकरणांना रोखण्यासाठी तयार केली जाते. विशेष रेडियो फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून ते शत्रूच्या ड्रोनची ओळख पटवते. त्यानंतर संशयास्पद हालचालींना टिपत सुरक्षा रक्षकांपर्यंत ते पोहोचते. त्यानंतर ते पाडले जाते. सुमारे पाच किमीपर्यंत शत्रूच्या ड्रोनचा पत्ता लावू शकते. तसेच ते शोधून निष्क्रिय करु शकते. उत्तर प्रदेश सरकारने अशा प्रकारचे दहा सुरक्षा सिस्टम खऱेदी केली आहेत.
अँटी ड्रोन सिस्टिमसोबतच स्नायपर्स देखील राम मंदिराच्या परिसरात तैनात केले जाणार आहेत. या स्नायपर्सना ड्रोन्सना पाडण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशा प्रकारच्या ड्रोन्सला ते पाडणार आहेत ज्यांना लेझर आणि तांत्रिक उपकरणेही पाडणे अशक्य आहे.