मुंबई: शरीरासाठी प्रोटीन एक महत्त्वाचे पोषकतत्व असते. हे व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन सोर्समध्ये आढळते. मात्र अनेकदा योग्य खाणेपिणे नसल्याने शरीराला आवश्यक प्रोटीन मिळत नाही.
प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी काळे चणे हा चांगला पर्याय आहे.
काळ्या चण्यांमध्ये प्रोटीनशिवाय फायबर, व्हिटामिन्स, खनिजे आणि इतर अनेक पोषकतत्वे आढळतात. हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे.
हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि पाचनतंत्र मजबूत बनवण्यासाठी काळे चणे अतिशय फायदेशीर ठरतात.
जर तुमचे वय ३० वर्षांहून अधिक आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत आहेत तर भिजवलेले चणे तुमच्या डाएटमध्ये सामील करा.
वाढलेले वय रोखण्याचे काम चणे करते. यात मँगनीज असते. यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
भिजवलेले काळे चणे शाकाहारी लोकांसाठी आर्यनचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे हिमोग्लोबिनचा स्तर सुधारण्यास मदत होते. तसेच अॅनिमियाने त्रस्त लोकांसाठी चांगले आहे.
भिजवलेल्या चण्यामध्ये कॅलरीज कमी असतात. यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हा प्रोटीन, फायबरचा चांगला स्त्रोत आहे.याचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो. त्यामुळे वेटलॉसससाठी चांगला पर्याय आहे.
एक मूठ चणे पाण्यात कमीत कमी आठ तासांसाठी भिडवा. जर तुम्ही गरम पाण्यात भिजवले तर चार ते पाच तास पुरेसे आहेत.
तुम्ही हे चणे नाश्त्यात असेच खाऊ शकता. तसेच यासोबत टोमॅटो, कांदा आणि काकडी मिसळून याचे सलाद बनवून खाऊ शकता.