Monday, July 15, 2024
Homeक्रीडाAUS Open 2024: ४३ वर्षीय रोहन बोपण्णाने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियन ओपन जिंकत...

AUS Open 2024: ४३ वर्षीय रोहन बोपण्णाने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियन ओपन जिंकत बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

मुंबई: ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतात दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णाने आपला ऑस्ट्रेलियन पार्टनर मॅथ्यू एब्डेनसोबत मिळून पुरूष डबल्सचा खिताब जिंकला आहे. शनिवारी मेलबर्न पार्कमध्ये खेळवण्यात आलेल्या फायनल सामन्यात दुसरा सीडेड रोहन-एब्डेनच्या जोडीने इटलीच्या सिमोन बोलेली आणि आंद्रे वावसोरीला ७-६(०), ७-५ असे हरवले.

बोपण्णाने या खेळाडूचा मोडला वर्ल्ड रेकॉर्ड

४३ वर्षीय रोहन बोपण्णा ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर पुरुष खेळाडू बनला आहे. जुना रेकॉर्ड नेदरलँड्सच्या जीन-ज्युलियन रोजरच्या नावावर होता. त्याने ४० वर्ष आणि ९ महिने तके वय असताना मार्सेलो अरेवोलासोबत मिळून २०२२च्या फ्रेंच ओपनमध्ये पुरुष दुहेरीचा खिताब जिंकला होता.

फायनल सामन्यात इतालवी खेळाडूंनी बोपण्णा-एब्डन जोडीला चांगलीच टक्कर दिला. पहिला सेट टायब्रेकरपर्यंत खेचला. टायब्रेकरमध्ये बोपण्णा-एब्डेनने मिळून एकही गेम गमावला नाही आणि पहिला सेट जिंकला. दुसरा सेटही रोमहर्षक राहिला. दरम्यान त्या सेटमघ्ये ११व्या गेममध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंची सर्व्हिस ब्रेक झाली. यामुळे सामना बोपण्णा-एब्डेनच्या बाजून झुकला. फायनल सामना १ तास ३९ मिनिटांपर्यंत चालला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -