मुंबई: पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा यांचा घटस्फोट झाला आहे. काही दिवसांपूर्वीच ही गोष्ट जाहीर झाली.
त्यानंतर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी लग्न केले. शोएबचे हे तिसरे लग्न आहे.
शोएब-सना यांच्या लग्नानंतर मिर्झा कुटुंबाकडून घटस्फोटाबाबत स्टेटमेंट करण्यात आले. या विधानात त्यांनी सानिया-शोएब यांच्या घटस्फोटाला दुजोरा दिला आहे.
View this post on Instagram
घटस्फोटाच्या अधिकृत घोषणेनंतर सानियाने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट केली आहे. सानियाने एक फोटो शेअर केला आहे. यात ती आरशात पाहत आहे. सानियाने कॅप्शनमध्ये लिहिले, रिफ्लेक्ट.
शोएब आणि सानिया यांचे लग्न १४ वर्षे चालले. दोघांनी २०१०मध्ये हैदराबादमध्ये अगदी धामधुमीत लग्न केले होते.
सानिया आणि शोएब यांना एक मुलगादेखील आहे. याचे नाव इजहान मिर्झा मलिक आहे.
५ वर्षांचा इजहान इन्स्टाग्रामवर अतिशय प्रसिद्ध आहे. त्याच्या या प्लॅटफॉर्मवर एकट्याचे १ लाख २३ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.