PM Narendra Modi : सोलापुरात पंतप्रधान मोदी म्हणाले, 'लहानपणी मलाही अशा घरात...

  135

कामगार वसाहतीचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी झाले भावूक


सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज देशातील सर्वात मोठ्या कामगार वसाहतीचे (Labour colony) उद्घाटन करण्याकरता सोलापुरात (Solapur) दाखल झाले. यावेळी त्यांनी अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. ३० हजार घराचे लोकार्पण करण्यात आले. ३० हजार डेमो फ्लॅटची पाहणी करण्यात आली. तसेत १० लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आले. अमृत योजनेतून १७०० कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी मोदींनी केली. यावेळेस भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी भावूक झाले. तसेच लहानपणी मलाही अशा घरात राहण्याची संधी मिळायला हवी होती, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत बोलत पंढरपुरचा विठ्ठल आणि सिद्धेश्वर यांना नमस्कार केला. मोदी म्हणाले, रामाचे २२ जानेवारीला आपल्या घरात आगमन होणार आहे. संतांच्या मार्गदर्शनानुसार मी विशेष व्रत करत आहे. महाराष्ट्रातील नाशिक येथील पंचवटीच्या भूमीतून त्याची सुरुवात झाली हाही योगायोगच म्हणावा लागेल. रामभक्तीच्या वातावरणात आज १ लाखापेक्षा जास्त कुटुंबाचा गृहप्रवेश होत आहे याचा मला खूप आनंद होत आहे. मला आनंद आहे की हे कुटुंब आपल्या पक्या घरात राम ज्योती प्रज्वलित करणार आहेत.



सोलापुरातील कामगारांना घरं मिळालं. महाराष्ट्रातील लोकांमुळे महाराष्ट्राचा विकास झाल्याचे मोदी म्हणाले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, मला वाटते की मलाही अशा घरात राहण्याची संधी मिळाली असती तर... एवढ्या लोकांचे स्वप्न पूर्ण होत आहे. ह्या गोष्टी मी पाहतो तेव्हा मला खूप आनंद होतो.


नरेंद्र मोदी म्हणाले, माझं आणि सोलापुरचं जुनं नातं आहे. हातमाग कामगार, विक्रेते, यंत्रमाग कामगार, चिंधी वेचणारे, विडी कामगार, चालक अशा लाभार्थ्यांना पीएमएवाय-अर्बन योजनेंतर्गत तयार केलेल्या घरांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले.


२२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या सोहळ्याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "हा काळ आपल्या सर्वांसाठी भक्तीचा आहे. तो ऐतिहासिक क्षण २२ जानेवारीला येणार आहे, जेव्हा आपले प्रभू राम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. मंदिरात आपल्या मूर्तीचे दर्शन घेण्याचे अनेक दशकांचे दुःख आता दूर होणार आहे", असं मोदी म्हणाले.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये