Bharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो यात्रेच्या मार्गात बदल करणं पडलं महागात; आसाममध्ये तक्रार दाखल!

  73

'गांधी कुटुंबच सर्वात भ्रष्ट' आसामच्या मुख्यमंत्र्यांची टीका


मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या (Bharat Jodo Nyay Yatra) विरोधात गुरुवारी आसाम (Assam) पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिलेली नसतानाही यात्रेच्या मार्गात बदल केल्याने पोलिसांनी ही तक्रार दाखल केली आहे. ही यात्रा शहरांच्या मध्यभागातून न काढता त्यासाठी पर्यायी मार्ग वापरा, हट्ट धरण्यात आला तर पोलिसांची फौज देखील तयार असेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मात्र त्याचे पालन न झाल्याने या यात्रेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान ही यात्रा आता नागालँडमधून आसाममध्ये पोहचली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने काँग्रेसकडून ही यात्रा देशभरात आयोजित केली आहे. मात्र, आसाममध्ये या यात्रेला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे इतर राज्यांतही यात्रा आयोजित करताना काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत.


आसाममध्ये यात्रा रवाना होताच राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, कदाचित देशातलं सर्वात भ्रष्ट सरकार आणि सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री या राज्यात आहे. यावर हिमंता बिस्वा सरमा यांनीही तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, 'गांधी कुटुंबच देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. ही राहुल गांधींची ‘न्याय यात्रा’ नसून ‘मियाँ यात्रा’ आहे. जिथे जिथे मुस्लिम आहेत तिथे ते जातात', अशी टीका त्यांनी केली. 'मियां' हा मूलतः आसाममधील बंगाली भाषिक मुस्लिमांसाठी वापरला जाणारा अपमानास्पद शब्द आहे.

Comments
Add Comment

जर्मन वृत्तपत्राचा मोठा दावा: ट्रम्प यांचे ४ फोन, पण पंतप्रधान मोदींनी प्रतिसाद दिला नाही

नवी दिल्ली: अमेरिका आणि भारत यांच्यातील वाढत्या व्यापार तणावादरम्यान एक खळबळजनक दावा समोर आला आहे. जर्मन

अंडाकरी बनवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने केली आत्महत्या

धमतरी (छत्तीसगढ): छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ त्याच्या

वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत

पंतप्रधान मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार आहेत. या संदर्भात परराष्ट्र सचिव

उदयगिरी आणि हिमगिरी, २ निलगिरी-क्लास फ्रिगेट्स भारतीय नौदलात दाखल

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात नौदलाने मंगळवारी आयएनएस

भिंतीवरून उडी मारून पलायन करणारा आमदार ईडीच्या ताब्यात

फोन नाल्यात फेकला कोलकाता : पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीतील कथित