दररोज असे करा मनुक्यांचे सेवन, होतील भरपूर फायदे

मुंबई: मनुक्यामध्ये प्रोटीन, फायबर, आर्यन, पोटॅशियम, कॉपर, व्हिटामिन बी६ आणि मँगनीजसोबत अनेक महत्त्वाचे पोषकतत्वे असतात.

याच्या सेवनाने आपली प्रतिकारक्षमता मजबूत होते. यामुळे अनेक आजारांपासून वाचता येते.

जर तुम्हाला मनुक्यामधील अधिक पोषकतत्वे मिळवायची आहेत तर याचे सेवन तुम्ही भिजवून केले पाहिजे.

तुम्ही दररोज रात्री २० ते ३० मनुका भिजवून सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करावे. जेव्हा तुम्ही मनुका भिजवून खाता तेव्हा त्यावरील साल हलके होते.

त्यानंतर याचे सेवन केल्याने मनुक्यामधील व्हिटामिन्स आणि मिनरल्स सरळ तुमच्या शरीरात जातात. याशिवाय भिजवून खाल्ल्याने यातील अँटी ऑक्सिडंट तत्वही वाढतात.

मनुक्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाणही पुरेसे असते जे दात आणि हाडे मजबूत ठेवण्यास मदत होते.

मनुक्यामध्ये फायबर आणि खूप सारे व्हिटामिन्स मिनरल्स असतात. यामुळे हार्ट अॅटॅक, स्ट्रोक, हायपरटेन्शसारखे समस्या कमी होतात.

यात नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाणही अधिक असते. यामुळे शरीरात ब्लड फ्लो चांगल्या प्रमाणात होतो.

मनुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अमिनो अॅसिड असतात ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. याशिवाय ज्या पाण्यात तुम्ही मनुका भिजवता ते पाणी प्यायल्याने अॅनिमियाची समस्या दूर होते.
Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे