Lok Sabha Election : मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागा जिंकण्याचा निर्धार!

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत 'मिशन महाविजय २०२४' अंतर्गत मुंबई भाजपा लोकसभा निवडणूक संचालन समितीची पहिली बैठक

निवडणूक संचालन समितीचे समन्वयक म्हणून अतुल भातखळकर यांची नियुक्ती


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर मिशन 'महाविजय २०२४' अंतर्गत मुंबई भाजपा लोकसभा निवडणूक संचालन समितीची पहिली बैठक केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली दादर येथील मुंबई भाजपा कार्यालयात आज पार पडली. या बैठकीत मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला.


या बैठकीला कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन, लोकसभा निवडणूक संचालन समितीचे संयोजक आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपा आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.


मुंबई भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे. याच अनुषंगाने मुंबई लोकसभा निवडणूक समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्षपद मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्याकडे असून आ. अतुल भातखळकर संयोजक, तर संजय उपाध्याय, आ. सुनील राणे, आ. अमित साटम आणि आ. योगेश सागर यांना सह-संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याशिवाय विविध प्रकारचे ३६ विभाग तयार करण्यात आले असून, त्याची जबाबदारी अंतर्गत पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.


मोदी सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. ही विकासकामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुरू आहे. लोकसभा, विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. तसेच संघटनात्मक बांधणीवर जोर दिला जात आहे.


बुथ समित्या अधिक सक्षम करून पक्षाने दिलेले कार्यक्रम अधिक व्यापक नियोजन करुन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले जात आहे. आज प्रथम संयोजन समितीची बैठक झाली. त्यानंतर या समितीच्या कोअर ग्रूपने मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघाचा त्या मतदार संघाचे खासदार, आमदार आणि जिल्हा अध्यक्ष, महामंत्री यांच्याकडून आढावा घेतला.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजप-शिंदे गटाची जोरदार मुसंडी! भाजप ११, तर शिंदे गट १० जागांवर आघाडीवर

११४ च्या मॅजिक फिगरकडे महायुतीची वेगाने वाटचाल मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 'किल्ला' काबीज करण्यासाठी मैदानात

मुंबईत मतमोजणीला सुरुवात, अशी सुरू आहे मतमोजणी ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

मुंबई मनपासाठी ५२.९४ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे २४० लोकल फेऱ्या रद्द

काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य