Shiv Thakare : पेपर, दुधाची लाईन ते थेट हक्काचं घर; अमरावतीचा शिव ठाकरे झाला मुंबईकर!

काहीच दिवसांपूर्वी घेतली होती ३० लाखांची गाडी


मुंबई : शिव ठाकरे (Shiv Thakare) हा टेलिव्हिजन विश्वातील (TV industry) प्रसिद्ध चेहरा असून बिग बॉस (Bigg Boss), खतरों के खिलाडी (Khatron ke Khiladi) अशा रिअॅलिटी शोजमधून (Reality Shows) तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मूळ अमरावतीच्या असलेल्या शिवने त्याच्या स्टाईलमुळे आणि फिटनेसमुळे स्वतःचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सध्या तो 'झलक दिखला जा 11' (Jhalak Dikhhla Jaa 11) या शोमुळे बराच चर्चेत आहे. त्यातच शिवने त्याच्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. अमरावतीचा शिव आता मुंबईकर झाला आहे. त्याने मुंबईत स्वतःचं हक्काचं आलिशान घर खरेदी केलं आहे.


शिवने आठ दिवसांपूर्वी मुंबईत घर घेतलं. नववर्षाचा मुहूर्त साधून त्याने ही बातमी त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली. नवीन घर घेतल्यानिमित्त फराह खानने शिवला एक गणेश मूर्ती भेट दिली आहे. आपला आनंद व्यक्त करताना शिव म्हणाला की, "२०२३ हे वर्ष माझ्यासाठी खूपच खास होतं. या वर्षात आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या. सेकंड हँड कार खरेदी करण्याची माझी इच्छा होती. पण या वर्षात मी ३० लाख रुपयांची नवी कार विकत घेतली".


शिव पुढे म्हणाला, "मुंबईत स्वत:चं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. घराच्या वाढत्या किंमती आणि कर्जाचे हप्ते यात संपूर्ण आयुष्य जातं. अखेर याच मुंबईत मी हक्काचं आलिशान घर घेतलं आहे. आठ दिवसांपूर्वीच मी नवीन घर घेतलं आहे".


शिव ठाकरे सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. इन्स्टावर त्याचे २.४ मिलीयन म्हणजेच २० लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. रिअॅलिटी शोजमधील त्याची खेळी चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस उतरते. असं असलं तरी प्रसिद्धी मिळण्याआधी शिवने खूप मेहनत घेतली आहे. पैशांसाठी त्याने वृत्तपत्र विकण्याचे काम केले आहे. तसेच तो घरोघरी जाऊन दुधाच्या पिशव्यांची विक्री करत होता. पुढे डान्सची आवड असल्याने त्याने डान्स क्लास घ्यायला सुरुवात केली. या सर्व कामांतून मिळणारे पैसे शिव त्याच्या आईला देत असे. कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं हे ध्यानात ठेऊन शिवने आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. शिवच्या या प्रगतीचं चाहते कौतुक करत आहेत.

Comments
Add Comment

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या