School Bus Accident : शाळेच्या सहलीसाठी कोकणात जात असताना बसचा भीषण अपघात

  291

दोघांचा मृत्यू, तर ५५ जण जखमी


रायगड : गेल्या काही दिवसांत अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच रायगडमध्ये (Raigad News) आज सकाळी एक भीषण अपघात (Terrible Accident) झाला. पुण्याहून शाळेची सहल (School picnic) कोकणात येत असताना या ट्रॅव्हल बसचा अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला, तर ५५ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


रायगडमधील माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हीणी घाटात अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने शाळेच्या सहलीची खासगी बस उलटली. कोंडेघर गाव हद्दीत हा अपघात झाला. अपघातात बसमधील अनेक प्रवासी अडकले होते. अपघाताची माहिती मिळताच गावकरी मदतीला धावून आले घटनास्थळी महाड, माणगाव इथून बचाव पथके, रुग्णवाहिका रवाना झाल्या. नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढले.


पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून तब्बल ५५ जण जखमी झाले आहेत. सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला असून जखमींवर नजीकच्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. दरम्यान, अपघातामुळे काही काळ विस्कळीत झालेली या मार्गावरची वाहतूक आता सुरळीत सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


कोकणातील रस्त्यांवरुन आणि घाटवळणांतून अनेक अपघातांचे प्रकार समोर येत आहेत. काहीच दिवसांपूर्वी शाळेची सहल कोकण दर्शन करुन परतत असताना घाटात तिचा अपघात झाला होता, ज्यात एका शिक्षकाला जीव गमवावा लागला. यानंतर पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली आहे.

Comments
Add Comment

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून