
महागाईशी लढण्यासाठी केंद्र सरकारचे भारत ब्रँडला प्रोत्साहन
नवी दिल्ली : महागाईशी लढण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने(narendra modi)ice भारत ब्रँडला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने महागाईपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून फक्त २५ रुपये 'किलो'ने तांदूळ विकणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 'भारत' नावाच्या ब्रँडचे दाळ आणि पीठ लाँच केले होते. यानंतर 'भारत'चाच तांदूळ २५ रूपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. सरकारने या तांदळाची योग्यरित्या विक्री व्हावी, यासाठी विशेष उपाययोजना केली आहे. यापूर्वी या ब्रँडच्या दाळींची आणि पीठाचीही विक्री सुरु करण्यात आली आहे.
इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने भारत नावाच्या बँडचा तांदूळ केंद्र सरकारने लाँच केल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्र सरकारने नेमून दिलेल्या स्टोअर्समध्ये हा तांदूळ विकला जाईल.
केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या भावांबाबत व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे. सरकार बासमती तांदूळ २५ रुपये 'किलो'ने उपलब्ध करुन देत आहे. मात्र, तरिही बासमती तांदळाचे भाव ५० रुपये 'किलो'वर पोहोचले आहेत. केंद्र सरकारने तांदळाची साठवण करुन ठेवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सरकार तांदूळाची साठवण करुन भाव वाढवणाऱ्यांविरोधात अॅक्शन मोडवर आले आहे. साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णयही सरकारने घेतला होता.