बॅनरवर महाराजांपेक्षा माझा फोटो मोठा का..?काढा तो बॅनर...राजेंपेक्षा कोणीच मोठा नाही

जरांगे पाटलांचा सज्जड इशारा, बॅनर काढल्यानंतरच बैठकीला सुरूवात


अंतरवली सराटी (प्रतिनिधी) - अंतरवाली सराटी येथे रविवारी मराठा समाजाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरातील २५ ते ३० हजार मराठा बांधव सहभागी झाले होते. बैठकीत पुढील ठराव सर्वानुमते पास झाले.बैठकीचे नियोजन करणाऱ्या समन्वयकांनी बैठक स्थळी लावलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज याच्या प्रतिमेपेक्षा मनोज जरांगे यांची प्रतिमा मोठी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्वतः जरांगे यांनी समन्वयकांना खडसावून बॅनरवर महाराजांपेक्षा माझा फोटो मोठा का..?काढा तो बॅनर.... राजेंपेक्षा कोणीच मोठा नाही असा सज्जड दम देऊन तो बॅनर काढायला लावला, त्यानंतरच बैठकीला सुरुवात झाली.

या बैठकीत मराठ्यांचा ओबीसीत समावेश झाल्या मुळे SC, ST आणि VJ-NT बांधवांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही(वेगळा प्रवर्ग असल्यामुळे). काहीजण म्हणतात ओबीसींवर अन्याय होईल. परंतु मराठ्यांच्या ५४ लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत, अजूनही सापडतील. त्यामुळे मराठे ओबीसीतच आहेत.

न्या. शिंदे समिती २४ डिसेंबरला रोजी सरकारला आपला अहवाल सादर करणार आहे. त्या ५४ लाख नोंदींचा आधार घेऊन सरकारने सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कायदा पास करावा. काही तालुक्यातील मुजोर अधिकारी कुणबी नोंदी नाहीत असे सांगत आहेत(उदा. नायगाव, नांदेड). मराठ्यांनी वैयक्तिक शोध घेतला तेव्हा प्रचंड नोंदी सापडल्या. सरकारने न्या. शिंदे समितीची मुदत वाढवावी व २४ डिसेंबरच्या पुढेही समितीचे काम सुरुच ठेवावे.

ज्यांच्या नावाची कुणबी नोंद सापडली आहे, त्यांच्या परिवाराचा आज जेवढा विस्तार आहे, त्या सर्व सदस्यांना व रक्ताचे नातेवाईक यांना सरकारने तात्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरु करावे. मराठ्यांनी सरकारला कायदा करण्यासाठी २४ डिसेंबर पर्येंत मुदत दिली, त्यात कोणताही बदल होणार नाही.अंतरवाली सह राज्यातील सर्व गुन्हे माघे घेणार, कोणालाही अटक करणार नाही असे सरकारने सांगितले होते. अजून गुन्हे माघे घेतलेले नाहीत. २४ डिसेंबर पर्येंत सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत.

सरकारने कोपर्डीचा खटला लवकर निकाली काढावा


राज्यातील जवळपास १३ हजार मराठा विद्यार्थ्यांची नोकरीत निवड झाली आहे. परंतु त्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत. त्या नियुक्त्या लवकरात लवकर द्याव्यात.मराठ्यांनी बांध टोकरने बंद करा, भावकीतील भांडणे मिटवा, एकमेकांना सहकार्य करा, लग्न साधे करा. दारू पिऊ नका. जगातील सर्वात प्रगत जात मराठ्यांची असेल.अंतरवाली सराटी येथील उपोषण सोडवताना सरकारचे प्रतिनिधी आणि आपल्यात जे मुद्दे ठरले होते, त्यावर १८ तारखेला मुख्यमंत्री स्वतः विधिमंडळात उत्तर देणार आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून मराठा आरक्षणावर सकारात्मक निर्णय येईल अशी मराठा समाजाला अपेक्षा आहे.


“२५ डिसेंबरला मी पुन्हा आमरण उपोषण सुरु करतो” असे जरांगे पाटील म्हणताच, बैठकीत गोंधळ झाला व पुन्हा आमरण उपोषण नको अशी विनंती समाज बांधवांनी केली. ती पाटलांनी ऐकली व उपोषणाचा निर्णय मागे घेतला. २४ डिसेंबर नंतरच्या आंदोलनाची दिशा. २३ डिसेंबरच्या बीडच्या सभेत जाहीर केला जाणार. २४ डिसेंबर नंतरचे आंदोलन सरकारला परवडणारे नसेल.आंदोलन शांततेत होईल परंतु पूर्ण तयारीनिशी कोटीने मराठे सहभागी होतील आणि आरक्षणाशिवाय माघार घेतली जाणार नाही.आदी मुद्यावर चर्चा झाली.
Comments
Add Comment

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन