जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेत धमाकेदार विजय मिळवल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीपने सांगितले की काही ओव्हर टाकल्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. समुद्रसपाटीपासून मैदांनाची उंची जास्त असल्याने त्याला दम लागत होता. मात्र असे असतानाही त्याने ५ विकेट घेतल्या आणि आफ्रिकेला ११६ धावांवर गारद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात प्लेयर ऑफ दी मॅच निवडण्यात आले.
सामन्यानंतर अर्शदीपने सांगितले, थोडेसे थकल्यासारखे वाटत आहे. मात्र हा क्षण शानदार आहे. यासाठी मी टीम मॅनेजमेंटचे आभार मानेन. हे मैदान इतर मैदानांपेक्षा वेगळे आहे. येथे काही ओव्हर टाकल्यानंतर मला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यावेळेस हे मैदान समुद्रसपाटीपासून उंच असल्याचे मला लक्षात आले.
राहुल भाईने सांगितले पाच विकेट घ्यायल्या
अर्शदीपने सांगितले, देशासाठी खेळण्याचे सगळ्यांचेच स्वप्न असते. जेव्हा तुम्हाला हे करण्याची संधी मिळते तेव्हा ही फिलिंग चांगली असते. मी माझ्या भूमिकेचा आनंद घेत आहे. राहुल भाईला मी धन्यवाद हेईल. त्यांनी मला सांगितले की मला मजबूतपणे पुनरागमन केले पाहिजे आणि पाच विकेट घेण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे.
पहिल्यांदा वनडेत घेतल्या ५ विकेट
जोहान्सबर्ग वनडेत आफ्रिकेच्या सुरूवातीचे चारही विकेट अर्शदीपने घेतले होते. डावातील ९वा विकेटही त्याने घेतला. हे पहिल्यांदाच घडले होते की अर्शदीपने ५ विकेट मिळवल्या. याआधी त्याने तीन वनडे सामने खेळले होते मात्र त्याला कोणतेही यश मिळाले नव्हते.