पेण( देवा पेरवी ) – पेण तालुक्यातील वाशी खारेपाट विभागातील गावांना पिण्याचे पाणी मिळावे या मागणी करिता मागील ८ दिवस सुरु असलेले आमरण उपोषण अखेर जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या लेखी पत्राच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
भाजप आमदार रविशेठ पाटील, शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे, काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न पटलावर मांडून शासनाचे लक्ष वेधले. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या विभागात पाणीपुरवठा करीता 766 कोटींच्या प्रकल्पाला महिन्याभरात शासकीय मान्यता देण्याचे मान्य केले.
पेण तालुक्यातील हेटवणे धरण मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे काम मागील 16 वर्षांपासून प्रलंबित आहे. याच पाण्यावर येथील 52 गावांमधील 4268 हेक्टर सिंचन क्षेत्र आणि हजारो ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याकरिता पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून वाशी गावातील जगदंब माता मंदिराच्या प्रांगणात या विभागातील वेगवेगळ्या गावातील नऊ ग्रामस्थांनी आमरण उपोषण पुकारले होते.
अखेर आठव्या दिवशी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश्री राजभोज यांनी लेखी पत्र देऊन काम लवकरात लवकर सुरू करण्याचे मान्य केल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.
एका महिन्यात जर याची पूर्तता झाली नाही तर सर्व उपोषणकर्त्ये पुन्हा मोठ्या स्वरूपात हे आमरण उपोषण सुरू करतील असा इशारा नंदा म्हात्रे – कणे, हेमंत पाटील – वाशी, जितेंद्र ठाकूर – ठाकूरबेडी, अभि म्हात्रे – भाल विठ्ठलवाडी, दिलीप म्हात्रे – भाल विठ्ठलवाडी, स्वप्निल म्हात्रे – सरेभाग, चंद्रहास म्हात्रे – वढाव, अश्विनी ठाकूर – दादर, अजित पाटील – वाशी, प्रकाश माळी व परिसरातील उपोषणकर्त्यांनी दिला.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…