Shreyas Talpade : श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक, प्रकृती स्थिर; लवकरच मिळणार डिस्चार्ज

पत्नी दिप्ती तळपदेने दिली माहिती


मुंबई : प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) काल रात्री ‘वेलकम 3’ चित्रपटाचं शूटिंग करून घरी आल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामुळे चाहते आणि त्याच्या मित्रपरिवारामध्ये चिंता पसरली होती. मात्र श्रेयसच्या प्रकृतीबाबत आता समाधानकारक बाब समोर आली आहे. श्रेयसची अँजिओप्लास्टी करण्यात आली असून तो सध्या आयसीयूमध्ये (ICU) डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे आणि त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याची पत्नी दिप्ती तळपदेने (Dipti Talpade) सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.


श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याचे कळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत होते. आता श्रेयसची प्रकृती स्थिर असून लवकरच त्याला डिस्चार्जही मिळणार असल्याची माहिती त्याच्या पत्नीने दिली आहे.


दिप्ती तळपदे श्रेयसच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देत म्हणाली की, "माझ्या पतीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर चाहत्यांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं. त्यांनी व्यक्त केलेली चिंता आणि शुभेच्छांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. श्रेयसची प्रकृती आता स्थिर आहे. लवकरच त्याला डिस्चार्ज मिळेल. त्याच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देताना मला समाधान मिळत आहे."


दिप्ती पुढे म्हणाली, "या कठीण काळात बेलव्यू रुग्णालय आणि डॉक्टरांच्या संपूर्ण टीमने वेळेवर दिलेला प्रतिसाद महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळे त्यांचीही मी कृतज्ञ आहे. पण चाहत्यांना माझं भावनिक आवाहन आहे की, आमच्या गोपनीयतेचा कृपया आदर करावा. तुमचा अतूट पाठिंबा हाच आम्हा दोघांसाठी प्रचंड ताकदीचा स्त्रोत आहे".





श्रेयस तळपदे सध्या 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the Joungle) या सिनेमाचं शूटिंग करत आहे. तसेच कंगना रनौत (Kangana Ranaut) दिग्दर्शित 'इमरजेंसी' या सिनेमात तो दिसणार आहे. डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली सध्या मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेलव्यू रुग्णालयात श्रेयसवर उपचार सुरू आहेत.


Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी

मागील ११ वर्षांत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ११० हून अधिक मराठी शाळांना टाळे मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईकरांच्या आरोग्याला महापालिका निवडणुकांचा फटका !

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी दरम्यान, शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई