Sansad Security Breach : संसदेतील घटनेने महाराष्ट्र विधीमंडळ हादरले!

घेतला 'हा' मोठा निर्णय


नागपूर : संसदेत (Sansad) लोकसभेच्या (Loksabha) कामकाजादरम्यान दोघांनी आतमध्ये घुसून स्मोक कँडल्स (Smoke candles) जाळल्याच्या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटले आहेत. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Session) एक निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे (Neelam Gorhe) यांनी हा निर्णय घेतला आहे.


संसदेमध्ये धूर करणारे दोघजण हे एका खासदाराच्या पासेसच्या आधारे संसदेत आले होते. ते कामकाजादरम्यान प्रेक्षक गॅलरीमध्ये बसले होते. त्यावेळीच त्यांनी संधी साधत थेट सभागृहात उडी मारली आणि कोणालाही काही कळायच्या आत स्मोक कँडल्स फोडून धूर केला. या घटनेनंतर राज्य विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात आता गॅलरी पासेस देणं बंद केलं आहे. दोन्ही सभागृहात गॅलरी पास मिळणार नसल्याची माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.


विधानसभेत आता आमदारांना फक्त दोन पास दिले जाणार आहेत. अधिवेशन कालावधीत गर्दी नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. संसदेतील आजच्या घटनेनंतर ही भूमिका घेण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात याबाबतची माहिती दिली. लोकसभेतील घटनेनंतर विधिमंडळ सचिवांनी सुरक्षेचा आढावा घेतला आहे. विधिमंडळ परिसरातील सुरक्षा कडक करण्याचे आदेश सचिवांनी दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती यांनी देखील विधीमंडळ परिसरातील सुरक्षेबाबत विधीमंडळ सचिवांकडून माहिती घेतली आहे.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी