Karnataka government : कर्नाटकातही होणार महाराष्ट्रासारखे पक्षांतर; ५० ते ६० आमदार भाजपाच्या वाटेवर

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा मोठा दावा


बंगळुरू : जनता दल सेक्युलर पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी (Kumaraswamy) यांनी सत्ताधारी काँग्रेस (Congress) पक्षातले ५० ते ६० आमदार फुटून भाजपात जाऊ शकतात आणि महाराष्ट्रात घडलं तसं सत्ता परिवर्तन कर्नाटकात (Karnataka) घडू शकतं असा दावा केला आहे. काँग्रेस पक्षातले एक प्रभावशाली मंत्री आहेत ज्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईपासून वाचायचं आहे. त्यामुळे ते आणि त्यांच्यासह ५० ते ६० आमदार हे भाजपात जातील असा दावा केला आहे. सध्या त्या बड्या नेत्याची भाजपाशी चर्चा सुरु आहे असंही त्यांनी सांगितलं.


देशातील ५ राज्यातील विधानसभा निवडणूक निकालात भाजपाने घवघवीत यश मिळवलं. त्यामुळे, आगामी लोकसभा २०२४ च्या निवडणुकांसाठी भाजपाचा आत्मविश्वास वाढला असून भाजप अत्यंत जोमाने तयारी करत आहे. तेलंगणा राज्यातही काँग्रेसचा विजय झाला असला तरी अगदी एक जागा हाती असलेल्या भाजपने या निवडणुकीत तेलंगणाच्या आठ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे येत्या काळात तेलंगणातही भाजपचे वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे.


काही महिन्यांपूर्वी कर्नाटक राज्यही भाजपला गमवावं लागलं होतं. मात्र, कर्नाटकमधील काँग्रेस सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केला आहे. कर्नाटकमध्ये मंत्री असलेला एक काँग्रेस नेता ५० ते ६० आमदारांसह लवकरच भाजपात प्रवेश करेल. कदाचित लवकरच कर्नाटकमधील काँग्रेस सरकार कोसळेल, काहीही घडू शकतं. असा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे. कोणाच्याचही प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठपणा राहिलेला नाही, असेही ते म्हणाले.



मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातही अशीच स्थापन झाली भाजपची सत्ता


मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपनेआश्चर्यकारक सरकार स्थापन केलं होतं. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिर्रादित्य शिंदेंना आपल्या पक्षात घेत भाजपाने तेथील काँग्रेसचं सरकार पाडलं. तसेच, महाराष्ट्रातही शिवसेनेत मोठा बंड झाला आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात ४० ते ५० आमदारांनी भाजपासोबत महायुती करुन सरकार स्थापन केलं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आता, भाजपने कर्नाटकातही तोच फॉर्म्युला अवलंबण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे.

Comments
Add Comment

ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्ट ४ नोव्हेंबरला होणार लाँच

मुंबई : ह्युंदाई मोटर इंडिया आपल्या लोकप्रिय एसयूव्ही व्हेन्यूचे दुसऱ्या पिढीचे मॉडेल ४ नोव्हेंबर रोजी भारतीय

घरूनच भरता येणार शाळेची फी ! केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नवीन घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यांना पारदर्शकता सुधारण्यासाठी आणि पालकांसाठी सोयी

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी

करूर चेंगराचेंगरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा १३ ऑक्टोबरला निर्णय

चेन्नई : करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर १३ ऑक्टोबर रोजी

सर्वसामान्यांसाठी नवा परवडणारा 5G स्मार्टफोन, सॅमसंग गॅलेक्सी M17 5G

सॅमसंग गॅलेक्सी M17 5G फक्त ₹12,499 पासून, दमदार फीचर्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स  मुंबई : सॅमसंगने भारतात आपला

अतिरेक्यांना पकडण्याची ती पद्धत चुकली, चिदंबरम यांचे धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली : अतिरेकी भिंद्रनवाला आणि समर्थक शस्त्रसाठा घेऊन शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात लपले होते. या