BJP Protest : सावरकरांबद्दल अपशब्द वापरल्याने विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपचं काँग्रेसविरोधात आंदोलन

मात्र निशाण्यावर उद्धव ठाकरे...


नागपूर : नागपूरच्या विधानभवन (Nagpur Vidhanbhavan) परिसरात सत्ताधारी भाजपच्या (BJP Government) आमदारांनी आज अधिवेशन सुरु होण्यापूर्वी काँग्रेसविरोधात (Congress) आंदोलन केलं. काँग्रेसचे नेते प्रियांक खरगे (Priyank Kharge) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल हे आंदोलन करण्यात आलं. यावेळेस काँग्रेसविरोधात आंदोलन असलं तरी उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लक्ष्य करण्यात आलं होतं.


स्वातंत्र्यावीरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा निषेध असं म्हणत भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. 'सावरकर का यह अपमान, नहीं सहेगा हिंदुस्थान', 'खरगे हाय हाय', 'सोनिया जिनकी मम्मी है, वह काँग्रेस डमी है' अशा घोषणा देण्यात आल्या. याचसोबत उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधण्यात आला. 'उद्धव ठाकरे जवाब दो' असे बॅनर्स हातात घेऊन भाजपचे आमदार त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते.


अनेकदा विरोधकच विधानभवनाच्या पायऱ्यांवर विविध मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आंदोलन करत असतात. पण यावेळेस सत्ताधारी भाजपने विरोधकांच्या विरोधात आंदोलन केले. शिवाय सावरकरांबाबतच्या या मुद्द्यावरुन राज्यभरात इतर ठिकाणीही भाजप आणि सत्ताधारी शिवसेनेची आंदोलने सुरु आहेत.


लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली बाजू श्रेष्ठ आहे, हे दाखवण्यासाठी झटत आहे. त्या शर्यतीत भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे अशी बेताल वक्तव्ये करणाऱ्या काँग्रेसविरोधात आंदोलन करुन भाजपने आपला निषेध नोंदवला. त्याचसोबत इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची मान खाली घालणाऱ्या उबाठालासुद्धा भाजपकडून काँग्रेस नेत्याच्या कृत्याबाबत जबाब विचारण्यात आला.

Comments
Add Comment

Kolhapur Fire : आजऱ्यात पहाटे अग्नितांडव! ७ गाड्यांसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

आजरा : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास आगीने भीषण रौद्ररूप धारण केले. या आकस्मिक

राज्य सेवा आयोगाची मेगाभरती! जाणून घ्या, अर्जाची शेवटची तारीख, पात्रता आणि जागा

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत चर्चा सुरू असुन भरतीच्या

Ekvira Devi Karla : आई एकवीरा देवीच्या खजिन्यावर अध्यक्षांचा डल्ला? दागिने आणि रोकड हडपल्याचा पुजाऱ्याचा खळबळजनक आरोप!

लोणावळा : महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी देवस्थान (Ekvira Devi Karla) ट्रस्टमध्ये गेल्या

Jalgoan Crime : बाप की कसाई? जळगावात चौथी मुलगी झाली म्हणून ३ दिवसांच्या चिमुकलीची पाटाने ठेचून हत्या, जळगाव हादरलं!

जळगाव : मुलीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, पण जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावात एका नराधम पित्याने केवळ

दोन वाहनांच्या धडकेत जिवगल मैत्रिणींचा नाहक बळी

सोलापूर: सोलापुरातील मोहोळ तालुक्यात दोन वाहनांच्या धडकेमुळे झालेल्या अपघातावर हळहळ व्यक्त होत आहे. कारण या

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार