Aditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे अडचणीत; एसआयटी करणार चौकशी

  180

केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्यासह अनेक आमदारांनी केले होते गंभीर आरोप 


मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) वारंवार ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करत असलेल्या दिशा सालियनच्या हत्या प्रकरणात (Disha Salian Murder case) आदित्य ठाकरे आता चांगलेच अडचणीत सापडणार आहेत. राज्य सरकार (Maharashtra Government) आदित्य ठाकरेंची एसआयटी (SIT) चौकशी करणार आहे. सुजाता सौनिक एसआयटीसंदर्भात आजच चौकशीची ऑर्डर काढणार आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात हे एसआयटी पथक काम करणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना आता चौकशीला सामोरं जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही.


मागील काही दिवसांत दिशा सालियन हत्या प्रकरण फारच ढवळून निघालं आहे. केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासह अनेक आमदारांनी आदित्य ठाकरे यांच्यावर या प्रकरणात गंभीर आरोप केले होते. दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्याने उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते.


केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणालेले की, सुशांत सिंह आणि दिशा सालियनचं नाव आलं की, आदित्य ठाकरे चवताळतात. दिशा सालियन या एका भारतीय, महाराष्ट्रीय मुलीवर अत्याचार केला आहे, तिची हत्या केली आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे तिथे उपस्थित होते. त्यामुळे त्यांना सोडणार नाही. आता सत्ता भाजप आणि शिवसेनेची आहे हे लक्षात ठेवा, असंही नारायण राणे म्हणाले होते. तसेच आमदार नितेश राणे देखील सातत्याने आदित्य ठाकरेंवर आरोप करत असतात. त्यामुळे सरकारने याची गंभीरपणे दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.



राहुल कनाल यांनीही केली होती मागणी


आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटाला रामराम ठोकत मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा राहुल कनाल यांनी दिशा सालियन प्रकरणाची कारवाई टाळावी, म्हणून शिवसेनेत प्रवेश केल्याची टीका होत होती. या टीकेला उत्तर देताना राहुल कनाल यांनी पहिला घाव आदित्य ठाकरेंवरच घातला. या प्रकरणी पुन्हा फाईल ओपन करुन सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती.

Comments
Add Comment

Maratha Andolan : मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे प्रशासन सतर्क

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी आजपासून मुंबईच्या

आरक्षणाची न्यायालयीन लढाई हरणाऱ्यांना मराठ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर घणाघाती टीका

"कोर्टात मराठा आरक्षण टिकवण्यास मविआ व उबाठा अपयशी" ठाणे: महायुतीने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी

मुंबईत मराठा आंदोलनाला गालबोट; सीएसएमटी परिसरात आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : मुंबईत आज सकाळपासून मराठा आंदोलकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून मंत्रालय आणि छत्रपती शिवाजी महाराज

विरार पूर्व इमारत दुर्घटनेत घरे गमावलेल्या नागरिकांना म्हाडाची ६० घरे तात्पुरत्या स्वरूपात मिळणार !

मंत्री प्रताप सरनाईक यांनी विरार इमारत दुर्घटनेतील जखमींची हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली भेट पालघर:  विरारमध्ये

Maratha Andolan: मराठा आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी मिळाली, अटी व शर्ती लागू

मुंबई: मराठा आरक्षणासाठी बेमुदत आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी आझाद मैदानात

गणेश उत्सवात सोने जिंका! जेपी इन्फ्रा गणेश चतुर्थीला घर खरेदीदारांसाठी खास सोन्याचे पेंडंट बक्षीस देणार

मुंबई: मुंबईतील सर्वात विश्वासार्ह आणि आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या जेपी इन्फ्रा मुंबई