सिंधुदुर्ग हे छत्रपतींच्या सामर्थ्याचे प्रतीक

  145

सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार


महाराजांची प्रेरणा घेऊन भारत देश करतोय प्रगती


तारकर्ली : ‘मालवण आणि तारकर्लीचा हा सुंदर समुद्र किनारा, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण आणि इथले वातावरण हे भारतात नवा जोश निर्माण करत आहे. झुकू नका, थांबू नका, पुढे चला, हा मंत्र नौदलाने दिला आहे. आज मी नौदलाच्या अधिकाऱ्यांना नौदल दिवसाच्या शुभेच्छा देतो’, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नौदल दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमातील भाषणाला सुरुवात केली. ‘सिंधुदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ला पाहून आपला उर अभिमानाने भरुन येतो. छत्रपती शिवाजी महाराज यांना आरमाराचे महत्व पटले होते. जो समुद्रावर नियंत्रण ठेवतो त्याला सत्ता राखता येते, हे त्यांना माहीत होते. हिरोजी इंदुलकर, कान्होजी आंग्रे या वीरांनाही मी वंदन करतो. छत्रपती शिवजी महाराजांची प्रेरणा घेऊन गुलामीची मानसिकता सोडून भारत देश प्रगती करतो आहे’, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. यावेळी मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना आणि विशेषकरुन कोकणवासियांना संबोधित करताना मोदींनी काही महत्वाच्या घोषणा केल्या.




‘नारीशक्तीची संख्या वाढवण्यावरही आपण भर देत आहोत. नेव्हल शिपमध्ये पहिल्या महिला कमांडिंग अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. आजचा भारत हा आपल्यासाठी नवी लक्ष्य ठरवतो आहे ही खूप चांगली बाब आहे. एक मोठी ताकद भारताच्या मागे आहे आणि ती ताकद १४० कोटी लोकांच्या विश्वासाची ताकद आहे. भारताचा इतिहास हा एक हजार वर्षांच्या गुलामीचा इतिहास नाही, फक्त हार आणि निराशा यांचा इतिहास नाही. भारताचा इतिहास विजय, शौर्य, ज्ञान आणि विज्ञान यांचा इतिहास आहे. आपल्या समुद्री सामर्थ्याचा इतिहास आहे. एक काळ असा होता की ज्या काळात सुरतच्या किनाऱ्यावर ८० हून जास्त देशांची जहाजे असायची. विदेशांतून जेव्हा हल्ले झाले तेव्हा आपल्या शक्तींवर हल्ले केले गेले. आपली कला, कौशल्य विदेशी हल्ल्यांनी ठप्प केले होते. जेव्हा आपण समुद्रावरचे नियंत्रण घालवले तेव्हा आपण आर्थिकदृष्ट्याही कमकुवत झालो. आता आपल्या देशाला गतवैभव पुन्हा मिळवून द्यायचे आहे', असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. शिवरायांनी कमावलेली नौदलाची शक्ती आपण परकिय आक्रमणांमुळे गमावली, आता ती पुन्हा मिळवायची आहे’, असेही ते म्हणाले.


मालवण, रत्नागिरी, देवगडसह कोकण किनारी भागांसाठी खास योजनांची घोषणा


पंतप्रधान मोदींनी रत्नागिरी, देवगड, मालवण या कोकण किनारी भागांसाठी खास योजनांची घोषणा केली. मोदी म्हणाले, सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ आता सुरु झाले आहे. त्याचबरोबर दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर माझगावपर्यंत जोडणार आहे. इथल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील विशेष योजना बनविण्यात येत आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील रहिवासी भागांना वाचविणे ही आमची प्राथमिकता आहे. यासाठी मँग्रुव्हजचा भाग वाढवण्यावर भर दिला जात आहे. केंद्र सरकारने यासाठी विशेष ‘मिश्टी’ योजना बनवली आहे. ज्या मिश्टी योजनाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला ती योजना ५४० स्वेअर किमी अंतरावर राबवली जाणार आहे. त्यामध्ये ११ राज्यांमध्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशात मँग्रुव्हजचा विकास केला जाणार आहे. यामध्ये कोकणचाही सहभाग आहे. मोदी पुढे म्हणाले, यामध्ये मालवण, आचरा, रत्नागिरी, देवगड, विजयदुर्गसहित महाराष्ट्रातील अनेक साईट्सना मँग्रुव्हज मॅनेजमेंटसाठी निवड करण्यात आली आहे.


जलदुर्गांचे संरक्षणास केंद्र सरकार कटिबद्ध...


छत्रपती शिवाजी महराजांच्या काळात जे जलदुर्ग बनवले गेले त्यांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. आमचा प्रयत्न आहे की देशभरातून लोकांनी आपला हा गौरवशाली वारसा पहायला आले पाहिजे. इथून आपल्याला विकसित भाराताची यात्रा अधिक तीव्र करायची आहे.


नौदल गणवेशावर आता शिवरायांची राजमुद्रा...


भारताने आज गुलामीची मानसिकता मागे टाकली आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. नौसेनेच्या ध्वजाला मागच्या वर्षी महाराजांच्या विचारांशी जोडता आले, हे माझे भाग्य आहे. आता नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असेल आणि नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावे देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.

Comments
Add Comment

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले