Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीPanchak Marathi Movie : आता कोणाचा नंबर? माधुरी दीक्षित निर्मित 'पंचक'चा धमाकेदार...

Panchak Marathi Movie : आता कोणाचा नंबर? माधुरी दीक्षित निर्मित ‘पंचक’चा धमाकेदार टीझर आऊट!

दिलीप प्रभावळकरांसह सिनेमात दिसणार तगड्या मराठी कलाकारांची फौज

मुंबई : बॉलिवूडची (Bollywood) धक धक गर्ल माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) दसऱ्यानिमित्त तिच्या आगामी मराठी चित्रपट ‘पंचक’ची (Panchak Marathi movie) घोषणा केली होती. माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने यांनी ‘पंचक’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एक खास व्हीडिओ शेअर करून या जोडप्याने त्यांच्या या आगामी मराठी चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती दिली. हा चित्रपट ५ जानेवारी २०२४ रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान, आता या सिनेमाचा धमाकेदार टीझर (Teaser) आऊट झाला आहे.

पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटलं जातं. यात शुभ अशुभ घडलं, की ते पाच पटीने वाढतं. याच संकल्पनेवर आधारित ‘पंचक’ या चित्रपटाचा जबरदस्त टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट भरभरून मनोरंजन करणारा कौटुंबिक चित्रपट आहे. ५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन जयंत जठार आणि राहुल आवटे यांची असून डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने यांची निर्मिती आहे. तर नितीन प्रकाश वैद्य हे कार्यकारी निर्माता आहेत. चित्रपटाचं लेखन राहुल आवटे यांनी केलं आहे.

‘पंचक लागलं म्हणजे मृत्यूच्या घटिकेपासून ते वर्षभराच्या आत मृत व्यक्तीच्या कुटुंबातील किंवा जवळचे पाच मृत्यू संभवतील’ यावर या चित्रपटाची गोष्ट पुढे सरकते. पंचकमुळे सर्वांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे प्रत्येकालाच आता कोणाचा नंबर लागणार याची भीती वाटते. प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी काय सर्कस करणार हे पाहायला मजा येणार आहे. त्यामुळे आता नेमका कोणत्या पाच जणांचा नंबर लागणार की काही वेगळंच घडणार यासाठी हा चित्रपटच पाहावा लागेल. हा संपूर्ण प्रवास विनोदी पद्धतीने दाखवण्या येणार आहे, हे टीझर बघून समजते. तसेच या चित्रपटाला मालवणी भाषेचा ठसका देखील असणार आहे.

दिलीप प्रभावळकरांसह सिनेमात दिसणार तगड्या मराठी कलाकारांची फौज

माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ या सिनेमात अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) मुख्य भूमिकेत असणार आहेत. तसेच आनंद इंगळे (Anand Ingale), नंदिता पाटकर (Nandita Patkar), विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi), भारती आचरेकर (Bharati Acharekar), सतीश आळेकर (Satish Alekar), सागर तळाशीकर, दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar), दीप्ती देवी (Dipti Devi), संपदा जोगळेकर (Sampada Jogalekar), आशिष कुलकर्णी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. एकंदरीतच या सिनेमात प्रेक्षकांना दमदार कलाकारांचा दर्जेदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

सिच्युएशनल कॉमेडी आणि ब्लॅक कॅामेडी यांचा मेळ

टीझर बघून प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. गंभीर परिस्थिती अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न ‘पंचक’मधून करण्यात आला असून सिच्युएशनल कॉमेडी आणि ब्लॅक कॉमेडी यांचा मेळ यात पाहायला मिळणार आहे. माधुरी दीक्षितने या सिनेमाबाबत बोलताना सांगितलं, की ‘पंचक’ ही आमची दुसरी निर्मिती असून यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. ‘पंचक’ हा आम्ही खूप मनापासून बनवलेला चित्रपट असून नक्कीच प्रेक्षकांसाठी हा मनोरंजनाचा डोस ठरेल याची मला खात्री आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ५ जानेवारीला ‘पंचक’ घेऊन आम्ही येत आहोत, जो सर्वांना वर्षभर आनंदी ठेवेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -