Thursday, July 18, 2024
Homeक्रीडाT20 World Cup 2024: युगांडा क्रिकेट टीमने रचला इतिहास, वर्ल्डकप २०२४साठी केले...

T20 World Cup 2024: युगांडा क्रिकेट टीमने रचला इतिहास, वर्ल्डकप २०२४साठी केले क्वालिफाय

मुंबई: युंगाडा क्रिकेट टीमने(yuganda cricket team) इतिहास रचताना २०२४मध्ये खेळवल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी(t-20 world cup 2024) क्वालिफाय केले आहे. गेल्या मंगळवारी नामिबियाच्या संघाने टी-२० विश्वचषक २०२४साठी आपली पात्रता सिद्ध केली होती. त्यानंतर आता युगांडा क्रिकेट संघाने २०२४च्या क्रिकेट विश्वचषकाच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.

युंगाडा आफ्रिका क्वालिफायर्सच्या माध्यमातून टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ठरला आहे. युगांडाने क्वालिफायरच्या सहाव्या सामन्यात रवांडाच्या संघाला ९ विकेट आणि ७१ चेंडू राखत मात दिली आणि टी-२० विश्वचषकासाठी आपली पात्रता सिद्ध केली. क्वालिफायर्स सामन्यांत युगांडाने ६ सामन्यांपैकी ५ सामन्यांत विजय मिळवला.

रवांडाविरुद्ध खेळवल्या गेलेल्या पहिल्या सामन्याबाबत बोलायचे झाल्यास पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी उतरलेल्या रवांडाच्या संघाला युगांडाच्या गोलंदाजांनी केवळ १८.५ षटकांत ६५ धावांवर ऑलआऊट केले. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल आव्हानाचा पाठलाग करताना त्यांनी ८.१ षटकांत १ विकेट गमावत विजय आपल्या नावे केला.

क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात युगांडाने तनजानियाला ८ विकेट आणि २८ बॉल राखत मात दिली. त्यानंतर त्यांनी पुढील सामना नामिबियाविरुद्ध ६ विकेटनी गमावला. दरम्यान, यानंतर युगांडाने कोणताही सामना गमावला नाही. तिसऱ्या सामन्यात युगांडाने झिम्बाब्वेला ५ विकेट आणि ५ चेंडू राखत हरवले.

पुढे जात असताना युगांडाच्या संघाने चौथ्या सामन्यात नायजेरियाला ९ विकेट आणि १५ बॉल राखत पराभवाचे पाणी पाजले. त्यानंतरच्या पाचव्या सामन्यात केनियाला ३३ धावांनी हरवले आणि सहाव्या सामन्यात रवांडाला ९ विकेटनी हरवत स्वत:ला टी-२० विश्वचषक २०२४साठी पात्र बनवले. या पद्धतीने त्यांनी गेल्या सलग ४ सामन्यांत युगांडाने विजय मिळवत विश्वचषकासाठी पात्रता सिद्ध केली

टी-२० विश्वचषकासाठी आतापर्यंत क्वालिफाय झालेले संघ

वेस्ट इंडिज, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -